मागील वर्षभरात ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकपदी अधिकारी टिकत नसल्याचे चित्र आहे. त्यातच आता महिनाभराच्या कालावधीत तिसरा वैद्यकीय अधीक्षक नेमण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी अधीक्षक न बदलण्याचे जाहीर केल्यानंतर आठवडाभरात नवीन अधीक्षकांची नियुक्ती झाली आहे. यामुळे ससून रुग्णालयातील अनागोंदी कारभार समोर आला आहे.मागील काही दिवसांपासून वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील भामरे यांच्या जागी नवीन अधीक्षक नेमण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे ते रजेवर गेले होते. आता त्यांच्या जागी शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किरणकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षभरात सहावा आणि महिनाभराच्या कालावधीत तिसरा अधिकारी या पदावर नियुक्त झाला आहे. ससूनच्या वैद्यकीय अधीक्षकपदी मे महिन्यात डॉ. यल्लपा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांना हटवून डॉ. सुनील भामरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता डॉ. जाधव यांच्या रुपाने तिसरा अधीक्षक नेमण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...