Saturday, July 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘नवी मुंबई इको नाइट्स’ संघाच्या बोधचिन्हाचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 13, 2023
in maharashtra
0
‘नवी मुंबई इको नाइट्स’ संघाच्या बोधचिन्हाचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग 2.0 स्पर्धा’ जाहीर करण्यात आली असून मागील वर्षी देशातील मोठया शहरांमध्ये सर्वाधिक युवक सहभागाचा प्रथम पुरस्कार प्राप्त नवी मुंबई शहर आपला पहिला नंबर कायम राखण्यासाठी सज्ज झाले असून ‘नवी मुंबई इको नाईट्स’ या नवी मुंबई शहराच्या संघाच्या बोधचिन्ह नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

17 सप्टेंबर या राष्ट्रव्यापी सेवा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्तरावर इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून ‘युथ वर्सेस गार्बेज’ अर्थात ‘कचऱ्याविरोधातील लढाईत युवकांचा सहभाग’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्यावेत असे अभिप्रेत असल्याचे सांगत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महानगरपालिका या स्पर्धेसाठी सज्ज असून मागील वर्षीपेक्षा आपण अधिक उत्तम कामगिरी करु अशी खात्री आयुक्तांनी दिली.

मागील वर्षी देशभरातील 1800 शहरे यामध्ये सहभागी झाली होती व नवी मुंबईला सर्वाधिक युवक सहभागाचा बहुमान लाभला होता. यावर्षी 4000 हून अधिक शहरे सहभागी झाली असून हे आव्हान मोठे असले तरी आपण त्यामध्ये यशस्वी होऊ असा विश्वास नवी मुंबईकर स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या उत्साहाच्या बळावर आयुक्तांनी व्यक्त केला.

नवी मुंबईचे भूषण असलेले जगप्रसिध्द संगीतकार गायक पद्मश्री शंकर महादेवन हे नवी मुंबई इको नाईट्स संघाचे कर्णधार असून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण ही कचऱ्याविरोधातील लढाई जिंकू असे आयुक्तांनी ठामपणे सांगितले.

‘इंडियन स्वच्छता लीग’ अंतर्गत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून 12 सप्टेंबर रोजी बोधचिन्ह अनावरण, 13 सप्टेंबर रोजी सोसायटयांना भेटी देत स्वच्छताविषयक जनजागृती, 14 सप्टेंबर रोजी तृतीयपंथीय नागरिकांमार्फत अभिनव पध्दतीने स्वच्छता जनजागृती तसेच स्वच्छताकर्मींची दहीहंडी, 15 सप्टेंबर रोजी एकाच वेळी नवी मुंबईतील सर्व शाळांमध्ये लाखो विदयार्थ्यांची स्वच्छ चित्रकला स्पर्धा, 16 सप्टेंबर रोजी मॉलमध्ये जनजागृती त्याचप्रमाणे 17 सप्टेंबर रोजी सर्व आठही विभाग कार्यालय क्षेत्रात त्या त्या ठिकाणच्या मध्यवर्ती स्थळी स्वच्छतेचा सामुहिक शपथ ग्रहण कार्यक्रम असे विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत.

या उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहावी व स्वच्छतेची लाट सर्वत्र पसरावी यादृष्टीने 17 सप्टेंबरला बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात निश्चित केलेल्या ठराविक ठिकाणी सकाळी 8.00 वाजता सर्व नागरिकांनी एकत्र येऊन स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण करण्याच्या एकाच वेळी आठ कार्यक्रमांची आखणी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेली आहे.

यामध्ये शालेय व महाविदयालयीन विदयार्थी व शिक्षक, युवक, लोकप्रतिनिधी, महिला बचतगट व महिला मंडळे यांच्या सदस्य, विविध प्रकारच्या संस्थांचे सदस्य, सोसायटयांचे पदाधिकारी व सदस्य, ज्येष्ठ नागरिक व नागरिक तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून उत्साहाने सहभागी व्हावे व स्वच्छ नवी मुंबई शहराप्रती आपल्या मनात असलेले प्रेम व्यक्त करावे असे आवाहन यावेळी आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केले.

नवी मुंबई इको नाइट्स हा आपला नवी मुंबईचा संघ इंडियन स्वच्छता लीगमध्ये मागील वर्षीपेक्षा अधिक उत्तम कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त करीत लीग अंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वैशिष्टयपूर्ण उपक्रमांची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात दिली.

Post Views: 103
Previous Post

जिल्हा पुरवठा अधिकारी झाले..”लोहपुरुष”

Next Post

ठाणे – ड्रोन, क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टच्या उड्डाणास बंदी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ठाणे – ड्रोन, क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टच्या उड्डाणास बंदी

ठाणे - ड्रोन, क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टच्या उड्डाणास बंदी

ताज्या बातम्या

भवानी पेठेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू #viral #marathinews #solapurnews

July 25, 2026

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली #viral

July 25, 2026
आमदार राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा

आमदार राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा

July 24, 2026

बुधवारी श्री.वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव

July 24, 2026
श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा  मानकरी  बीड चा अर्जुन रहाडे 

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा  मानकरी  बीड चा अर्जुन रहाडे 

July 24, 2026

उपवास’ महागला! बटाटा वेफर्स, साबुदाणा चिवड्याचे दर २४० रुपयांवर

July 24, 2026
पी. एस. इंग्लिश मिडीयमच्या प्रांगणात रंगला बाल भक्तांचा मेळा

पी. एस. इंग्लिश मिडीयमच्या प्रांगणात रंगला बाल भक्तांचा मेळा

July 24, 2026

गावकरी पाण्याच्या तर ठेकेदार निधीच्या प्रतिक्षेत 

July 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0997774

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!