Sunday, May 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हिंदी सर्व स्थानिक भाषांना सक्षम करण्याचे माध्यम बनेल – अमित शाह

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 14, 2023
in india
0
हिंदी सर्व स्थानिक भाषांना सक्षम करण्याचे माध्यम बनेल – अमित शाह

The Chief Minister of Karnataka, Shri B.S. Yediyurappa meeting the Union Home Minister, Shri Amit Shah, in New Delhi on August 17, 2019.

0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हिंदीची कोणत्याही भारतीय भाषेशी स्पर्धा कधीच नव्हती आणि असू शकत नाही. आपल्या सर्व भाषांना सशक्त करूनच एक मजबूत राष्ट्र निर्माण होईल. हिंदी हे सर्व स्थानिक भाषांना सक्षम करण्याचे माध्यम बनेल, असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.

हिंदी दिनानिमित्त शाह यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, भारत हा विविध भाषांचा देश आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील भाषांच्या विविधतेला हिंदी एका सूत्रात बांधते. हिंदी ही लोकशाहीवादी भाषा आहे. तिने विविध भारतीय भाषा आणि बोली तसेच अनेक जागतिक भाषांचा सन्मानच केला आहे आणि त्यांमधील शब्द, संज्ञा आणि व्याकरणाचे नियमही स्वीकारले आहेत.

स्वातंत्र्य लढ्यातील खडतर काळात देशाला एका सूत्रात बांधण्याचे अभूतपूर्व काम हिंदी भाषेने केले. अनेक भाषा आणि बोलींमध्ये विभागलेल्या देशात एकतेची भावना प्रस्थापित केली असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. देशात पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण सर्वत्र स्वातंत्र्यलढा पुढे नेण्यात हिंदीने संवादाची भाषा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. देशात ‘स्वराज्य’ प्राप्ती आणि ‘स्वभाषेची’ चळवळ एकाच वेळी सुरु होती. स्वातंत्र्य चळवळीत आणि स्वातंत्र्यानंतर हिंदीची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन राज्यघटनेच्या निर्मात्यांनी 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला राजभाषा म्हणून स्वीकारले होते असे शाह म्हणाले.

कोणत्याही देशाची अस्सल आणि सृजनात्मक अभिव्यक्ती खऱ्या अर्थाने त्या देशाच्या भाषेतूनच व्यक्त होऊ शकते असे ते म्हणाले. प्रसिद्ध साहित्यिक भारतेंदु हरिश्चंद्र यांनी लिहिले आहे की, ‘निज भाषा उन्नती अहै, सब उन्नति कौ मूल’ म्हणजेच भाषेची उन्नती हीच सर्व प्रकारच्या उन्नतीचे मूळ आहे. आपल्या सर्व भारतीय भाषा आणि बोली हा आपला सांस्कृतिक वारसा आहे, आपण तो जपत पुढे न्यायचा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय भाषांना राष्ट्रीय ते जागतिक मंचावर उचित मान्यता आणि सन्मान मिळाला आहे असे अमित शाह म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांसाठी, प्रशासनासाठी, शिक्षणासाठी आणि वैज्ञानिक वापरासाठी भारतीय भाषा उपयुक्त व्हाव्यात यासाठी गृह मंत्रालयाचा राजभाषा विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सरकार आणि जनता यांच्यात भारतीय भाषांमध्ये संवाद प्रस्थापित करून लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत असे ते म्हणाले.

देशात राजभाषेत केलेल्या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी संसदीय राजभाषा समितीची स्थापना करण्यात आली होती. देशातील सरकारी कामात हिंदीच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्याची आणि त्याचा अहवाल तयार करुन माननीय राष्ट्रपतींना सादर करण्याची जबाबदारी या समितीला देण्यात आली होती असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. मला कळवण्यात आनंद होत आहे की या अहवालाचा 12वा खंड राष्ट्रपतींना सादर करण्यात आला आहे. 2014 पर्यंत या अहवालाचे केवळ 9 खंड सादर करण्यात आले होते, परंतु आम्ही गेल्या 4 वर्षांतच 3 खंड सादर केले आहेत. 2019 पासून, सर्व 59 मंत्रालयांमध्ये हिंदी सल्लागार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत आणि त्यांच्या बैठकाही नियमितपणे आयोजित केल्या जात आहेत. देशाच्या विविध भागात राजभाषेचा वापर वाढावा या उद्देशाने आतापर्यंत एकूण 528 नगर राजभाषा कार्यान्वयन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. परदेशातही लंडन, सिंगापूर, फिजी, दुबई आणि पोर्ट-लुईस येथे नगर राजभाषा कार्यान्वयन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठीही भारताने पुढाकार घेतला आहे.

राजभाषा विभागाने ‘अखिल भारतीय राजभाषा संमेलना’ची नवी परंपराही सुरू केल्याचे गृहमंत्री म्हणाले. बनारस येथे 13-14 नोव्हेंबर 2021 रोजी पहिली अखिल भारतीय राजभाषा परिषद आयोजित करण्यात आली होती आणि दुसरी अखिल भारतीय राजभाषा परिषद 14 सप्टेंबर 2022 रोजी सुरत येथे आयोजित करण्यात आली होती. यंदा पुण्यात तिसरे अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. तंत्रज्ञानानुरुप राजभाषा विकसित होण्यासाठी ‘कंठस्थ’ ही स्मृती-आधारित भाषांतर प्रणालीही राजभाषा विभागाने तयार केली आहे. राजभाषा विभागाने आणखी पुढाकार घेत ‘हिंदी शब्द सिंधु’ हा शब्दकोशही तयार केला आहे. संविधानाच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट भारतीय भाषांमधील शब्दांचा समावेश करून हा शब्दकोश सतत समृद्ध केला जात आहे. एकूण 90 हजार शब्दांचा ‘ई-महाशब्दकोश’ हे मोबाईल अॅप आणि सुमारे नऊ हजार वाक्यांचा ‘ई-सरल’ शब्दकोशही विभागाने तयार केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

भाषा बदलाचे तत्व असे सांगते की “भाषा जटिलतेकडून साधेपणाकडे जाते” असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. माझ्या मते, कार्यालयीन कामकाजात हिंदीतील सोपे आणि स्पष्ट शब्द वापरले पाहिजेत. मला विश्वास आहे की राजभाषा विभागाच्या या प्रयत्नांमुळे, सर्व मातृभाषा आत्मसात करून, लोकसंमत असलेली हिंदी भाषा, विज्ञान-संमत आणि तंत्रज्ञान-संमत बनून एक समृद्ध राजभाषा म्हणून प्रस्थापित होईल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हिंदी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे शाह म्हणाले.

Post Views: 130
Previous Post

अहंकारी युती आगामी काळात ‘सनातन धर्मा’वर हल्ला चढवणार आहे; कोट्यवधी सनातनीं एकत्र येऊन त्यांना रोखावे……

Next Post

नाशकात नियम पालन न केल्याने 90 दुचाकी चालकांचा मृत्यू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नाशकात नियम पालन न केल्याने 90 दुचाकी चालकांचा मृत्यू

नाशकात नियम पालन न केल्याने 90 दुचाकी चालकांचा मृत्यू

ताज्या बातम्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्गात वृक्षारोपन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्गात वृक्षारोपन

May 31, 2026
पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची सीडबॉल कार्याशाळेस भेट

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची सीडबॉल कार्याशाळेस भेट

May 31, 2026

महापालिका शाळांमध्ये सोमवार पासून नव्या पाठ्यपुस्तकांचे बीटनिहाय वाटप

May 31, 2026

खांडवीत वाहनासमोर अचानक आला बिबट्या

May 31, 2026
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांना ४५ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन तभा वृत्तसेवा

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांना ४५ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन तभा वृत्तसेवा

May 31, 2026

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

May 31, 2026
स्कार, शिस्त आणि गुणवत्तेचा वारसा जपणारे मुख्याध्यापक राजकुमार कस्तुरे

स्कार, शिस्त आणि गुणवत्तेचा वारसा जपणारे मुख्याध्यापक राजकुमार कस्तुरे

May 31, 2026
कै. कर्मवीर लोहोकरे गुरुजी यांचे जीवनाचा उपासक ग्रंथ प्रदान

कै. कर्मवीर लोहोकरे गुरुजी यांचे जीवनाचा उपासक ग्रंथ प्रदान

May 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0887711

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697