एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आणि मांगल्याचे वातावरण आहे. दरम्यान पालघरमध्ये दीड दिवसाच्या गणेश विसर्जनावेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मिळून तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे पालघरमध्ये शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये दोन परप्रांतीयांचाही समावेश आहे.
अधिक माहिती अशी की, वाडा तालुक्यातील कोणसई गावात दोन परप्रांतीय कामगार, तर गोऱ्हे येथे तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी कोणसई गावातील ओहळावर कंपनीच्या गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने जगन मौर्य (३८) व सुरज प्रजापती (२५) या दोन परप्रांतीयांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर गोऱ्हे येथील तलावात प्रकाश ठाकरे यांचा बुडून मृत्यू झाला आहे.


















