Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नात्याला काळीमा! बाप दारू पिऊन घरी आला; चिमुकलीला पाहताच पारा चढला, अन् केलं धक्कादायक कृत्य

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 25, 2023
in crime
0
नात्याला काळीमा! बाप दारू पिऊन घरी आला; चिमुकलीला पाहताच पारा चढला, अन् केलं धक्कादायक कृत्य
0
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मद्यपी पित्याने १० वर्षाच्या विशेष मुलीची हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी पित्याला अटक करण्यात आली आहे.

 

ऐन गणेश उत्सवाच्या काळात वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा लागणारी घटना डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवलीजवळ असलेल्या मानपाडा गावात रविवारी संध्याकाळी एका दारुड्या बापाने स्वतःच्या घरात आपल्या १० वर्षाच्या विशेष मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. या प्रकारानंतर मारेकरी पिता पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी गेला आणि तेथे मुलगी मयत झाल्याची माहिती देऊन तेथून तो फरार झाला. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे.

 

दरम्यान मुलीची आई लिलावती अग्रहरी हिच्या तक्रारीवरुन पती मनोज अग्रहरी (३५) या दारुड्या पित्याविरुध्द मानपाडा पोलिसांनी खुनाचा गु्न्हा दाखल केला आहे. मानपाडा पोलिसांनी मध्यरात्री मनोज याला अटक केली असून अग्रहरी कुटुंब गरीब आहे. तक्रारदार लिलावती यांना चार मुली आहेत. त्यातील दुसरी मुलगी विशेष आहे. आरोपी वडील मनोज हा दारुडा असून डोंबिवलीत एका किरणा दुकानात तो कामगार म्हणून काम करत होता, असे मानपाडा पोलीस स्टेशनचे क्राईम पिआय राम चोपडे यांनी सांगितले आहे.

बाहेरून गावठी दारू पिऊन आल्यावर मनोज नेहमी पत्नी आणि मुलींसह विशेष मुलीला मारत असायचा. या मुलीचा काही उपयोग नाही. तिला मरावेच लागेल, अशी भाषा तो करत असायचा. याबद्दल पत्नीने तक्रार दाखल केली आहे. दरम्यान विशेष मुलीच्या संगोपनाकडे आईचे पूर्ण लक्ष असायचे. दुपारच्या वेळेत मुलीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याने ती कामावरुन काही वेळासाठी घरी यायची आणि पुन्हा कामावर जात असे. रविवारी संध्याकाळी मनोज नेहमीप्रमाणे यथेच्छ दारू पिऊन घरी आला. त्याने दारुच्या नशेत ओढणीच्या साह्याने मुलीचा गळा दाबून हत्या केली. मात्र शेजारच्यांना या प्रकाराची कुणकुण लागली होती.

 

त्यानंतर मनोज हा पत्नी काम करत असलेल्या एमआयडीसीतील कामाच्या ठिकाणी गेला. तेथील कर्मचाऱ्यांना पत्नी लिलावती हिला तातडीने घरी जाण्यास सांगा आणि मुलगी मयत झाली आहे, असा निरोप दिला. तेथून मनोजने पळ काढला. कर्मचाऱ्यांनी मुलीची आई लिलावतीला तिच्या पतीने केलेले कूकर्म सांगितले. हे ऐकून लिलावतीने तातडीने घरी पळ काढला. तेव्हा मुलगी बिछान्यावर निपचित पडली होती. लिलावतीने पती मनोजने आपल्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला. लिलावतीने पती मनोज अग्रहरी विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली. मानपाडा पोलिसांनी मध्यरात्री मनोज याला अटक केली असून आरोपी मनोजला आज न्यायाल्यात हजर केले जाईल, असे मानपाडा पोलीस स्टेशनचे क्राईम पिआय राम चोपडे यांनी सांगितले.

Post Views: 118
Previous Post

रावसाहेब दानवे लालबाग यांच्या चरणी..

Next Post

‘ड्रीम इलेव्हन’ कंपनीला 25 हजार कोटींची नोटीस

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
‘ड्रीम इलेव्हन’ कंपनीला 25 हजार कोटींची नोटीस

'ड्रीम इलेव्हन' कंपनीला 25 हजार कोटींची नोटीस

ताज्या बातम्या

आमचं पुन्हा ठरलं महापालिका आयुक्त आणि सभापती जाणार डेन्मार्क दौऱ्यावर #solapurnews

May 16, 2026

दिव्यांगांचे तात्पुरते प्रमाणपत्र असेल तर सर्व योजना होणार बंद #solapurnews #marathinews

May 16, 2026

वाहनांना १ जुलैपासून ‘एचएसआरपी’ प्लेट अनिवार्य; नियमभंग केल्यास १,००० रुपयांचा दंड #marathinews

May 16, 2026

जशी न्यायाची प्रक्रिया गुन्हेगाराला जाणवते, तशी पीडित कुटुंबीयांनाही जाणवायला हवी #marathinews

May 16, 2026
व्ही. पी. शैक्षणिक संकुलातील कृषि महाविद्यालयाचा कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यशाचा झेंडा

व्ही. पी. शैक्षणिक संकुलातील कृषि महाविद्यालयाचा कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यशाचा झेंडा

May 16, 2026
खरीप पिकांच्या ‘एमएसपी’ वाढीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा-हेंमत पाटील 

खरीप पिकांच्या ‘एमएसपी’ वाढीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा-हेंमत पाटील 

May 16, 2026
पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

May 16, 2026
आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धे’त दिग्गज संघांची विजयी सलामी!

आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धे’त दिग्गज संघांची विजयी सलामी!

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0866611

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697