Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रशासनाने सेवाभावनेतून दिव्यांगांसाठी काम केले पाहिजे – बच्चू कडू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 13, 2023
in maharashtra
0
प्रशासनाने सेवाभावनेतून दिव्यांगांसाठी काम केले पाहिजे – बच्चू कडू
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संपुर्ण देशात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. ग्रामपंचायतस्तरापर्यंत दिव्यांगांसाठी 5 टक्के निधी खर्च केला जातो. दिव्यांगांच्या विविध समस्या आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आत्मियतेने त्यांच्यासाठी काम केल्यास त्यांच्या बऱ्याच समस्या निकाली निघण्यास सहाय्य होईल, असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले.

 

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानांतर्गत चरखा सभागृह येथे विशेष दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

 

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील नव्हे तर जगातील पहिले राज्य ठरले आहे. अर्थसंकल्पात दिव्यांगासाठी 5 टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. दिव्यांगाच्या कल्याणासाठी या निधीचा उपयोग केला जातो. दिव्यांग मंत्रालयामुळे अर्थाने दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे शक्य होणार आहे.

 

दिव्यांगांना देण्यात येणारे मानधन हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येते. यापूढे हे मानधन थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. ज्या दिव्यांगाना बँकेत जाता येत नाही, अशा दिव्यांगांना थेट घरपोच मानधन देण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. दिव्यांगांचे जीवनमान उंचविण्यासोबतच त्यांच्या कल्याणाठी गेल्या 15 वर्षात 82 शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येत असलेले अनुदान कमी असून त्यात वाढ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे श्री.कडू म्हणाले. दिव्यांगांना अंत्योदन योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. भविष्यात दिव्यांग निर्माणच होऊ नये, यासाठी प्रयत्न करावे लागतील. दिव्यांगांसाठी चांगले धोरण आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

प्रशासनाने दिव्यांगांची नोंदणी वाढवून त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे. विविध योजनेचा लाभ देण्यासोबतच आता दिव्यांगाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून अंध दिव्यांगासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुध्दा घेण्यात येत असल्याचे डॉ. पंकज भोयर म्हणाले. देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात दिव्यांग मंत्रालय स्थापन झाले आहे. त्यांच्यासाठी घरकुलाची स्वतंत्र योजना असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन उभे रहावे, अशी अपेक्षा असे आ.भोयर यांनी यावेळी व्यक्त केली. भवनसाठी जागा उपलब्ध झाल्यास बांधकामासाठी पाठपुरावा करून असे आ.भोयर यांच्या मागणीच्या अनुषंगाने श्री.कडू यांनी सांगितले.

 

जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंदणी वाढविण्यासाठी वर्धा सोबतच हिंगणघाट येथे वैद्यकीय बोर्ड स्थापन करण्यात आले आहे. नोंदणी झालेल्या दिव्यांगांची आरोग्य तपासणी करुन लवकरात लवकर दिव्यांगत्व प्रमाणपत्र उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ब्रेल लिपीची स्वतंत्र नोंदणी करण्यासाठी कक्ष उघडण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले. दिव्यांगाना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सीएमईजीपी योजनेंतर्गत वाहतुक करण्यासाठी 50 ई-रिक्षा वाहनाचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून लवकरच दिव्यांगाना ई-रिक्षा उपलब्ध देण्यात येणार असल्याचे राहुल कर्डिले म्हणाले.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जिल्ह्यात दिव्यांगांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्याहस्ते काही दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनेच्या लाभाचे वितरण करण्यात आले. मान्यवरांच्याहस्ते यावेळी दिव्यांग योजनेची घडीपुस्तिका व मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुक बधीर मुकबधीर विद्यालय, नालवाडी व रावसाहेब निवासी मतिमंद विद्यालय देवळीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

 

अध्यक्षांनी दिव्यांगांजवळ जावून साधला संवाद

उद्घाटन समारंभानंतर दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू यांनी चरखा सभागृहातील प्रत्येक दिव्यांगांजवळ जावून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या असलेल्या अडीअडचणी तसेच त्यांना कोणत्या सहाय्य किंवा योजना, उपक्रमांचा लाभ पाहिजे आहे, याची विचारपुस केली. विशेष म्हणजे प्रत्यक्ष दिव्यांगांजवळ जावून त्यांची निवेदने स्विकारली.

 

दिव्यांग बांधवांनी फुलले चरखागृह

संपुर्ण जिल्हाभरातून जवळपास 6 ते 7 हजार दिव्यांग बांधव व त्यांचे सहकारी शिबिराला उपस्थित होते. दिव्यांगांसाठी विविध योजना राबविणारे विभाग व महामंडळांचे जवळपास 35 स्टॅाल शिबिरस्थळी उभारण्यात आले होते. दिव्यांगांच्या आरोग्य तपासणीसह विविध योजनांचा लाभ देण्यात आला. अनेक योजनांसाठी अर्ज स्विकारण्यात आले तसेच योजनांची माहिती देण्यात आली.

Post Views: 116
Previous Post

मध्य रेल्वे ३० दसरा/दिवाळी/छट सण विशेष गाड्या चालवणार

Next Post

भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार – मुनगंटीवार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार – मुनगंटीवार

भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार - मुनगंटीवार

ताज्या बातम्या

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677874

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697