Thursday, September 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कराड भीषण स्फोटात ९ जखमी, घरातील तिन्ही सिलिंडर सुरक्षित; मग स्फोटाचं नेमकं कारण काय?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 26, 2023
in maharashtra
0
कराड भीषण स्फोटात ९ जखमी, घरातील तिन्ही सिलिंडर सुरक्षित; मग स्फोटाचं नेमकं कारण काय?
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राहत्या घरात पहाटे स्फोट होऊन नऊ जण जखमी झाल्याची दुर्घटना आज कराड शहरातील हद्दवाढ भागातील मुजावर काॅलनीलगतच्या वस्तीत घडली. झालेला स्फोट इतका भीषण होता, की त्यात संबंधित घराची भिंत फुटून समोरच्या घरावर आदळली. त्यामध्ये इमारतीचे मोठे नुकसान झाले असून, एकाच कुटुंबातील ५ जण गंभीर जखमी, तर अन्य ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

शरीफ मुबारक मुल्ला (वय ३६), सुलताना शरीफ मुल्ला (वय ३२), जोया शरीफ मुल्ला (वय १०), राहत शरीफ मुल्ला (वय ७) यांच्यासह अशोक दिनकर पवार (वय ५४) सुनीता अशोक पवार (वय ४५), दत्तात्रय बंडू खिलारे (वय ८०, सर्व रा. मुजावर कॉलनी, शांतिनगर, कराड) अशी जखमींची नावे आहेत.

आज बुधवारी पहाटे मुजावर कॉलनी परिसरात नागरिक झोपेत असताना पाण्याच्या टाकीजवळील शरीफ मुल्ला यांच्या इमारतीत भीषण स्फोट झाला. गॅस सिलेंडरच्या टाकीला गळती लागल्याने हा स्फोट झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पहाटेच्या सुमारास झालेल्या स्फोटाच्या आवाजाने कराड हद्दवाढ भागातील परिसर हादरून गेला. ज्या इमारतीत स्फोट झाला, त्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. भिंती पडल्या आहेत. तीन ते चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये दुचाकी गाड्यांचा समावेश आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.

या घटनेत शरीफ मुल्ला, सुलताना मुल्ला, जोया मुल्ला, राहत मुल्ला असे एका कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शेजारच्या घरातील अशोक पवार, सुनीता पवार, दत्तात्रय खिलारे असे आणखी चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर आणखी तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. स्फोटानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी आसपासच्या परिसरात बॅरिकेड उभे करून गर्दी हटवली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता मुल्ला कुटुंबीयांच्या घरात गॅसचे तीन सिलेंडर आढळून आलेले आहेत. मात्र, तिन्ही सिलेंडर सुरक्षित आहेत. तसेच शेगडीही सुस्थितीत आहे. त्यामुळे हा स्फोट सिलेंडरचा झाला नसावा अशी दाट शक्यता आहे. स्फोटाचे नेमके कारण पोलिसांकडून शोधले जात आहे. दरम्यान, स्फोटाच्या घटनेनंतर घटनास्थळी पुण्यातील फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. तसेच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, प्रविण जाधव यांच्यासह पोलीस दाखल होते.

Post Views: 185
Previous Post

अमेरिकेतील लेविस्टन शहरात झालेल्या गोळीबारात २२ जणांचा मृत्यू, ६० जखमी

Next Post

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

ताज्या बातम्या

पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध

पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध

September 17, 2026

दरमहा ५ तारखेपूर्वी वेतन द्या, ७ व्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणाचे परिपत्रक काढा

September 17, 2026
बाप रे! तेजस विमान, अर्जुन रणगाड्याची सोलापुरात निर्मिती 

बाप रे! तेजस विमान, अर्जुन रणगाड्याची सोलापुरात निर्मिती 

September 17, 2026
गौरी गणपती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा पिलीव येथे रूट मार्च 

गौरी गणपती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा पिलीव येथे रूट मार्च 

September 17, 2026
एकदंत गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात ११३ जणांचे रक्तदान

एकदंत गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात ११३ जणांचे रक्तदान

September 17, 2026

सोलापूर टेनिक्वाईट  मुले व मुली निवड चाचणी स्पर्धा उद्या 

September 17, 2026
सिंहगड महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा

सिंहगड महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा

September 17, 2026
६५ वर्ष पूर्ण झालेल्या दोन चालकांना सन्मान निधी योजनेचा लाभ प्रदान

६५ वर्ष पूर्ण झालेल्या दोन चालकांना सन्मान निधी योजनेचा लाभ प्रदान

September 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1223231

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!