Wednesday, April 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नववर्षात महाराष्ट्रावरील पाणीसंकट होणार अधिक गडद, राज्यभरात केवळ ‘इतके’ टक्के पाणीसाठा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 29, 2023
in maharashtra
0
नववर्षात महाराष्ट्रावरील पाणीसंकट होणार अधिक गडद, राज्यभरात केवळ ‘इतके’ टक्के पाणीसाठा
0
SHARES
67
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यात नववर्षात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे आहेत. राज्यभरातील छोटी-मोठी धरणे मिळून केवळ ६३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असून, यात छत्रपती संभाजीनगर विभागातील जलसाठा सर्वांत कमी म्हणजे ३६.७१ टक्के इतकाच शिल्लक आहे. वेगाने घटत असलेल्या पाणीसाठ्यामुळे नववर्षात राज्यातील नागरिकांसमोर पाणीकपातीचे संकट उभे ठाकले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांतील जलसाठा तब्बल २० टक्क्यांनी कमी आहे. दुसरीकडे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असून, जवळपास ७८ टक्के पाणीसाठा अजूनही उपलब्ध आहे.

सध्या राज्यात सगळीकडे नाताळ आणि नववर्ष स्वागताचा उत्साह आहे. जोडून आलेल्या सुट्ट्या आणि शाळेला असलेल्या सुट्ट्यांमुळे शनिवारपासूनच राज्यातील पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रांमध्ये नागरिकांनी एकच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, सुट्ट्यांच्या या मोसमात नागरिकांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यातील अनेक विभागांत पावसाने ओढ दिल्याने पावसाळ्यानंतरच पाणीकपातीचे संकट उभे राहिले होते. राज्य सरकारकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, पाणीटंचाईमुळे ३८९ टँकरने ९६१ वाड्यांना, तर ३६६ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. या आकडेवारीत दिवसागणिक भर पडत आहे. राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान आकाराच्या धरणांमध्ये जलसाठा कमी होत आहे.

रविवारी सकाळी जलसंपदा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीने राज्यातील नागरिकांच्या चिंतेत भर टाकली. राज्यातील एकूण २,९९४ लहान-मोठ्या धरणांतील जलसाठ्याची आकडेवारी पाहता नववर्षात पाणीप्रश्न पेटणार हे निश्चित समजले जात आहे. सद्यस्थितीत राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून ६३ टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. यात छत्रपती संभाजीनगर विभागाची स्थिती सर्वांत बिकट असून मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांमध्ये केवळ ३६.७१ टक्के पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वांत मोठे धरण असलेल्या जायकवाडी धरणात केवळ ४३.३९ टक्के पाणीसाठा आहे. उजनी धरणातही केवळ १८.४३ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.

नागपूर विभागातील एकूण ३८३ धरणांमध्ये ६८.३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागात असून, यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग भागातील धरणांचा समावेश होतो. राज्यातील पाणीसाठा चिंताजनक असला, तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा तुलनेने समाधानकारक आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा (९७.१३ टक्के) भातसा (७७.५५ टक्के), मोडकसागर (६६.७५ टक्के), मध्य वैतरणा (४६.४८ टक्के) आणि तानसा (७८.२४ टक्के) आदी धरणांमध्ये जवळपास सरासरी ७८ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे मुंबईकरांपुढे सध्यातरी पाणीकपातीची समस्या नसली तरी नजीकच्या काळात हे संकट ओढावण्याची दाट शक्यता आहे.

राज्यातील पाणीसाठा

धरण-सध्याच्या जलसाठा-मागील वर्षी याचवेळची टक्केवारी
उजनी-१८.४३टक्के-१००टक्के
जायकवाडी-४३.३९ टक्के-९१.७७ टक्के
गोसिखुर्द-५०.४४ टक्के-५८.०५ टक्के
तोतलाडोह-७४.४२ टक्के-८२.८२ टक्के
इसापूर-७६.३६ टक्के-९१.३९ टक्के
कोयना-७६.०५ टक्के-८५.८५ टक्के

Post Views: 75
Previous Post

नागपुरात तणाव:- कचऱ्याच्या टिप्परची धडक, बहीण-भावाचा मृत्यू, संतप्त जमावाने टिप्परच पेटवला…

Next Post

नाशिकचा रामभक्त अयोध्येला पायी निघाला…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नाशिकचा रामभक्त अयोध्येला पायी निघाला…

नाशिकचा रामभक्त अयोध्येला पायी निघाला...

ताज्या बातम्या

पत्नीवर केला चाकूने वार थोडक्यात वाचला जीव

April 15, 2026

अमेरिका करतोय इराणची कोंडी

April 15, 2026

‘त्या ‘ पाच हजार रुग्णांना आता घरीच मिळणार औषधे अन् उपचार

April 15, 2026

वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

April 15, 2026

अबब.. सोलापुरात उन्हाचा पारा पुन्हा वाढला तापमान ४३ अंश पार

April 15, 2026

आता काळाबाजार थांबणार फार्मर आयडी काढाच शेतकऱ्यांनो

April 15, 2026

अरे देवा दागिने बनवणारा निघाला चोर चक्क बनवले तांब्या पितळेचे दागिने

April 15, 2026

आता स्मशानातही पास

April 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0810723

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697