पुढील महिन्यात २२ जानेवारीला आयोध्या येथे प्रभु श्री रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचे संपूर्ण देशवासियांना मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. याच उत्सुकतेतून नाशिक येथील ५२ वर्षीय विरेंद्रसिंह टिळे हे गोदावरी नदीतील पाणी असलेला कलश घेऊन नाशिकमधील पंचवटी येथून पायी पदयात्रा करत अयोध्याकडे निघाले आहेत.
नाशिक येथील रहिवासी वीरेंद्रसिंह टिळे हे रामाचे भक्त आहेत. रामाचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव झाला आहे. त्यामुळे पाचशे वर्षानंतर आयोध्या येथे प्रभु श्री रामचंद्र यांची प्रतिष्ठापना होत असल्यामुळे वीरेंद्रसिंह टिळे यांच्यातही मोठा उत्साह संचारला आहे. प्रभू श्री रामचंद्र यांचं नाशिक मधील पंचवटी येथे वास्तव्य झाला आहे. त्यानंतर प्रभू श्री रामचंद्र हे नाशिकमधून वेगवेगळ्या मार्गाने अयोध्या येथे पोहोचले होते. त्यामुळे आयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाण्याने प्रभुशी रामचंद्र यांचा जल अभिषेक करण्याचा निर्णय वीरेंद्रसिंह टिळे यांनी घेतला. त्यांनी गोदावरीचा पाणी एका कलशामध्ये घेतलं. नाशिकहून थेट अयोध्या पर्यंत तब्बल पंधराशे किलोमीटरचा प्रवास पायी करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार ते हे नाशिक पंचवटी येथून आयोध्याच्या प्रवासाला निघाले आहेत. त्यांच्यासोबत गोदावरीचे पाणी असलेला कलश तसेच कपडे व लागणारे साहित्य असलेली बॅग सोबत आहे. अशा पद्धतीने वीरेंद्रसिंह टिळे हे दररोज ४० ते ४५ किलोमीटरचा प्रवास करतात. पहाटे चार वाजेपासून तर रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत त्यांचा प्रवास सुरू असतो. रात्री ते मिळेल त्या ठिकाणी जेवण करतात आणि झोपतात पुन्हा पहाटेपासून त्यांचा प्रवास सुरू होतो. मार्गात ठिकठिकाणी वीरेंद्रसिंह टिळे यांचं त्यांच्या आप्तेष्ट मित्र परिवाराकडून स्वागत केले जात आहे. अशा पद्धतीने प्रवास करत वीरेंद्रसिंह टिळे काल सायंकाळी जळगाव शहरात पोहोचले. यावेळी त्यांचे नागरिकांच्या वतीने वाजत गाजत भव्य स्वागत करण्यात आलं.
कुठलाही प्रांत अथवा प्रतिज्ञा केलेली नाही प्रभू श्री रामचंद्र यांच्यावरील भक्ती त्या भक्तीतूनच मी आयोध्याकडे पायी निघालो आहे, असं वीरेंद्रसिंह टिळे सांगतात. प्रभुशी रामचंद्र यांचं नाशिक मधील पंचवटी येथे वास्तव्य झाला असल्याने त्या ठिकाणच्या गोदावरी नदीच्या पाण्याने त्यांचा जल अभिषेक करण्यासाठी अयोध्येला जात आहे. २२ जानेवारीला आयोध्या पोहोचेल. त्या ठिकाणी पोहचल्यावर सोबत असलेल्या गोदावरी नदीच्या पाण्याने प्रभू श्री रामचंद्र यांच्या जलाभिषेक करणार असल्याचं वीरेंद्रसिंह टिळे सांगतात. अयोध्याला पोहोचण्यास ची प्रचंड मोठी उत्सुकता लागली आहे, त्यामुळे रस्त्यात कुठलाही थकवा जाणवत नसल्याचेही ते सांगतात. जळगाव येथील स्वागतानंतर आज पहाटे वीरेंद्रसिंह टिळे हे पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाले. दरम्यान प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तब्बल पंधराशे किलोमीटरचा प्रवास करून पायी आयोध्या जात असलेल्या या वीरेंद्रसिंह टिळे या राम भक्ताचे संपूर्ण राज्यात एकच चर्चा सुरू आहे.