येथील फतेपुर गावातील एका घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भविष्यात घातपात घडविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर रित्या घरात लपवून ठेवलेल्या ११ तलवारी जप्त करीत आरोपी बादल खोब्रागडे यास तरुणास अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली होती कि फतेपूर गावातील बादल खोब्रागडे या २७ वर्षीय तरुणाने भविष्यात घात पात घडविण्याच्या उद्देशाने आपल्या घरात ११ लोखंडी तलवारी लपवून ठेवल्या असता पोलिसांनी छापा मार कार्यवाही करीत बादल खोब्रागडे या तरुणांच्या घरातिल स्वयंपाक खोलीत एका बोरीत लपवुन ठेवलेल्या ११ तलवारी जप्त करीत आरोपीला अटक केली असून बादल खोब्रागडे यास घातक हत्यार/शस्त्र ( लोखंडी तलवारी ) बाळगण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्याचेकडे मिळुन आलेल्या लोखंडी तलवारी बाबत कसलेही कायदेशीर कागदपत्रे,अगर परवाना नसल्याचे सांगून त्याचा आत्तेभाऊ गौतम वाहाणे राहणार – वाजपेयी वॉर्ड गोंदिया याचे असल्याचे सांगून घरी आणून ठेवल्याचे सांगितले असता मिळुन आलेला मुद्देमाल आरोपी च्या ताब्यातून हस्तगत करून जप्त करण्यात आला असून आरोपी विरूद्ध पोलीस ठाणे गंगाझरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.