Sunday, March 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सीएसआरच्या माध्यमातून वंचित-शोषित घटकांच्या विकासासाठी प्रयत्न – नितीन गडकरी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 24, 2024
in india
0
सीएसआरच्या माध्यमातून वंचित-शोषित घटकांच्या विकासासाठी प्रयत्न – नितीन गडकरी
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सीएसआरच्या माध्यमातून वंचित आणि शोषित घटकांच्या विकासासाठी प्रयत्न सरकारमार्फत सुरू आहे. भारत सरकारने काही वर्षांपूर्वी सीएसआर संदर्भात कायदा केला. त्याचे सकारात्मक परिणाम दिसण्यास आता सुरुवात झाली आहे. सीएसआरच्या मदतीने गडचिरोलीसारख्या आदिवासी परिसरात सुमारे 1800 शाळा चांगल्या पद्धतीने चालवण्यात येत आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सीएसआर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजक कंपन्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘ॲक्ट ऑफ कम्पॅशन’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. टाईम्स ग्रुप आणि रूबी हॉल क्लिनिक यांच्या वतीने 9 विविध प्रवर्गांमधून एकूण 12 कंपन्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात टाईम्स ग्रुप्सच्या संचालिका सुधा नटराजन, रूबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रँट तसेच शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, वंचित-शोषित आणि गरिब सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून कंपन्यांनी सीएसआर उपक्रमांची आखणी करावी. त्याचा लाभ प्रत्येकाला होण्यासाठी त्या योग्य पद्धतीने राबवण्यात येणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, लातूरसारख्या पाणीटंचाई असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सीएसआरला तंत्रज्ञानाची जोड देऊन उपक्रम राबवण्यात यायला हवेत.

तसेच, सीएसआर उपक्रम हे केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित राहू नयेत. तर जिथे याची खऱ्या अर्थाने गरज असलेल्या ग्रामीण भागापर्यंत ही मोहीम पोहोचणे गरजेचे आहे. गरिब-गरजूंना आपल्या पायावर उभे करण्यासाठी सीएसआर उपयुक्त आहे. सीएसआरमुळे अनेक वंचितांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहेत. त्यांच्या यशकथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात. त्या माध्यमातून इतरांनाही अशा प्रकारचे काम करण्याची प्रेरणा मिळेल, असे श्री. गडकरी म्हणाले.

ॲक्ट ऑफ कम्पॅशन पुरस्कारांचे हे पहिलेच वर्ष असून त्यासाठी पुण्यातील सुमारे 120 कंपन्यांनी नामांकन अर्ज केले होते. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय ज्युरींच्या समितीने एकूण 9 प्रवर्गांमध्ये एकूण 12 कंपन्यांना हे पुरस्कार प्रदान केले.

 

नावे खालीलप्रमाणे –

1) एक्सिलन्स इन कम्युनिटी रेझिलियन्स अँड डिझास्टर रिस्पॉन्स – अ) फोर्ब्स मार्शल ब) तारा कन्स्ट्रक्शन्स

2) एक्सिलन्स इन कल्चरल प्रिझर्व्हेशन अँड हेरिटेज – पी. एन. गाडगीळ अँड सन्स प्रा. लि.

3) एक्सिलन्स इन डायव्हर्सिटी अँड इन्क्ल्युजन – टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल

4) एक्सिलन्स इन एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट – अ) थर्मेक्स फाऊंडेशन ब) हारविंजर सिस्टिम्स प्रा. लि.

5) एक्सलिन्स इन एम्पॉवरमेंट थ्रू एकोनॉमिक डेव्हलपमेंट – दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड

6) एक्लिलन्स इन एनव्हायरनमेंट सस्टेनिबिलिटी – अ) प्राज इंडस्ट्रीज ब) रेलफोर लॅब प्रा. लि.

7) एक्लिलन्स इन हेल्थ फॅसिलिटीज फॉर द अंडरप्रिव्हिलेज्ड – पर्सिस्टंट सिस्टिम्स

8) एक्सिलन्स इन हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट – रोहन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि.

9) एक्सिलन्स इन वूमन एम्पॉवरमेंट – प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड

Post Views: 50
Previous Post

‘भाबीजी घर पर है’च्या सेटवर ‘पान पार्टी’

Next Post

ईराणची पुन्हा एकदा पाकिस्तानात ‘एअर स्ट्राईक’

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ईराणची पुन्हा एकदा पाकिस्तानात ‘एअर स्ट्राईक’

ईराणची पुन्हा एकदा पाकिस्तानात 'एअर स्ट्राईक'

ताज्या बातम्या

औंढा नागनाथ येथे विराट हिंदू संमेलनास अलोट गर्दी;हिंदू बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

March 15, 2026

तरुणाने वंदे भारत ट्रेनच्या खिडकीची फोडली काच… अन घेतला सेल्फी

March 15, 2026

सत्यवान वाघमारे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

March 15, 2026

Solapur Tarun Bharat Digital Media

March 15, 2026

Solapur Tarun Bharat Digital Media

March 15, 2026

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी भाषण करून विरोधकांच्या भाषणाला उत्तर दिलं

March 15, 2026

लहान मुलांसोबत लिफ्ट वापरताना सावध राह दिघी मध्ये घडली घटना

March 15, 2026

अँट्रोसिटी कायद्यांतर्गत आता थेट अटक नाही मंत्री शिरसटांची माहिती

March 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0735927

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697