मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, सगे-साेयरे हा शब्दाचा अध्यादेशात समावेश करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्यात यावीत या मागणीसाठी जिल्ह्यात शनिवारपासून चक्काजाम आंदाेलन हाेणार आहे.पुढाऱ्यांना पुन्हा गावभेट बंदी करण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती माेर्चाचे समन्वयक माउली पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
पवार म्हणाले, मराठा समाज बांधव ११ तालुक्यात विविध ठिकाणी आंदाेलन करतील. आपल्या गावाच्या शेजारुन जाणारा हमरस्ता, राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग काही वेळ बंद ठेवतील. आंदाेलन शांततेत हाेईल. त्याला हिंसक वळण लागेल असे काेणीही वागणार नाही. आंदाेलन सकाळी १०.३० वाजता सुरू करावे. दुपारी १.३० पर्यंत संपवावे. बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मुलांना, पालकांना त्रास हाेईल असे काेणतेही कृत्य करू नये.यावेळी पुरुषाेत्तम बरडे, रवी माेहिते, प्रा. गणेश देशमुख, विनाेद भाेसले, महादेव गवळी, अनंत जाधव आदी उपस्थित हाेते.