Thursday, April 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

त्या नेत्याची पिपाणी केल्याशिवाय खासदार उदयनराजे थांबणार नाहीत, फडणवीस साताऱ्यात बरसले

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 5, 2024
in maharashtra
0
त्या नेत्याची पिपाणी केल्याशिवाय खासदार उदयनराजे थांबणार नाहीत, फडणवीस साताऱ्यात बरसले
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापुरात शाहू महाराजांना बिनविरोध करण्याची भाषा वापरणाऱ्या शरद पवार यांनी साताऱ्यात दुटप्पीपणा दाखवला आहे. त्यांनी शौचालयात पैसे खाणाऱ्या उमेदवाराला उदयनराजेंच्या विरोधात सातारा लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तुतारीची पिपाणी केल्याशिवाय खासदार उदयनराजे थांबणार नाहीत, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ साताऱ्यात निर्धार सभा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, साताऱ्याची ही विराट संकल्प सभा पाहून चार जूनच्या निकालादिवशी गुलाल उधळायला साताऱ्यात यावच लागेल, हे आता स्पष्ट दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल अत्यंत गतीने सुरू आहे. देश त्यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे, याची जाणीव संपूर्ण देशातील जनतेला झालेली आहे. सत्ता होती, तेव्हा जनतेला वाऱ्यावर सोडलेल्या नेत्याने मोदींना उसातलं काय कळतं अशी टिंगल केली होती. त्याच मोदींनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या साखर कारखान्यावर असलेला इन्कम टॅक्स रद्द करून शेतकऱ्यांची सुटका केली.

 

मोदींना समजलं ते तुम्हाला समजलं नाही. जनतेच्या मनातील स्पंदन हे मोदींना थेट समजते. कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या विरोधात महायुतीने उमेदवार द्यायला नको होता असे ते म्हणतात. मात्र, साताऱ्याच्या बाबतीत त्या उलट भूमिका घेतात यातून त्यांचा दुटप्पीपणा समोर आला आहे. उमेदवार दिला तोही घोटाळेबाज आहे. त्यामुळे साताऱ्याची जनताच उदयनराजेंना रेकॉर्ड ब्रेक मते देऊन छत्रपतींच्या भूमीचा हुंकार हा देशाचा हुंकार आहे, हे दाखवून देईल.

 

देशाला तांत्रिक दृष्ट्या मागास ठेवण्याचे पाप काँग्रेसने केले आहे. महायुतीच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यात तब्बल दहा हजार कोटींची कामे झाली. आता टुरिझम, आयटी पार्क, कृष्णा नदीचे शुद्धीकरण, एमआयडीसीची निर्मिती, स्ट्रॉबेरी, हळद, बटाटा संशोधन केंद्र, अग्रो प्रोसेसिंग युनिट्स उभारण्याच्या अनुषंगाने आम्ही पाऊले टाकत आहोत. आम्हाला केंद्र व राज्य सरकारचे निश्चितपणाने बळ मिळणार आहे. ५५ वर्षांमध्ये जे काँग्रेसला जमले नाही ते आम्ही दहा वर्षात करून दाखवले आणि इथून पुढच्या काळात देखील प्रगतीची ही गंगा अशीच वाहत राहणार आहे.

 

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते प्रचारामध्ये मतदारांच्या पायात साप सोडण्याचे काम करत आहेत. कुणी कितीही सांगितले तरी आम्ही खासदार उदयनराजे भोसले यांच्या सोबत काम करत आहोत. महायुतीचे चारही आमदार त्यांना मोठ्या मताधिक्याने विजय करू. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये साताऱ्यात आयटी पार्क उभारू असे म्हणताच श्रोत्यांमधील एक जण उठून देवेंद्रजी वुई लव यू, असे मोठ्याने म्हणाला. देवेंद्र फडणवीस यांनी आय अल्सो लव यू, असं म्हणत त्याला दाद दिली.

 

दोन महाराजांचा आदेश शिरसावंद्य

महाराजांचा आदेश न पाळण्याची बिशाद कोणाकडे नाही. त्यांनी आयटी हब, एमआयडीसी मागितली आहे, देशाचं आणि राज्याचे नेतृत्व खंबीर आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी निश्चितपणाने दिला जातील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, खासदार अमर साबळे, आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार मदन भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Post Views: 71
Previous Post

नगरमध्ये होणार पंतप्रधान मोदी यांच्यासह दिग्गजांच्या जाहीर सभा

Next Post

विकासासाठी धर्म आडवा येत असेल तर तो धर्म कसला, ठाकरेंनी मलेशियातला किस्सा सांगत समजावलं

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
विकासासाठी धर्म आडवा येत असेल तर तो धर्म कसला, ठाकरेंनी मलेशियातला किस्सा सांगत समजावलं

विकासासाठी धर्म आडवा येत असेल तर तो धर्म कसला, ठाकरेंनी मलेशियातला किस्सा सांगत समजावलं

ताज्या बातम्या

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज मिळेनात ; क्रीडा पुरस्कारांची तारीख पे तारीख

April 29, 2026

नाहक बदनामी केली तर अब्रुनुकसानीचा दावा करणार अजय दासरी

April 29, 2026

महानगरपालिकेत लोकसभा हक्क दिन साजरा

April 29, 2026

उदगीर येथे तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे

April 29, 2026

आत्मशुद्धीच्या दिव्या तेजाने उजळलेली डब्ल्यू आय टी जैन टेंपलची पावन पहाट

April 29, 2026

मंठा तालुक्यात अर्धनग्न आंदोलन

April 29, 2026

सोलापूरचा धाराशिववर दणदणीत विजय

April 29, 2026

पेवा येथे १७ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

April 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0837175

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697