अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात पुढील आठवड्यात 13 मे रोजी(सोमवारी) मतदान होणार आहे.या मतदार संघातील महायुती भाजपा चे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात जोराने सुरू आहे.प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात महायुतीच्या वरिष्ठ दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी,उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,केंद्रिय मंत्री नितिन गडकरी,ज्योतिरादित्य सिंधीया,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार, आ.नितेश राणे,पंकजा मुंडे,धनंजय मुंडे यांच्या सभांनी वातावरण अक्षरश: ढवळून निघणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा 7 मे रोजी (मंगळवारी) दुपारी4.30 वाजता नगर शहबरातील सावेडी परिसरात निरंकारी भवनशेजारील मैदानावर होणार आहे.8 मे रोजी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे दुपारी 4 वाजता सभा होणार आहे.तसेच सायंकाळी 6 वाजता राहुरी मध्ये तर रात्री 8 वाजता श्रीरामपूर धनंजय मुंडे यांची सभा होणार आहे.9 मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात येणार असून जामखेड व कोपरगाव येथे महायुतीचे उमेदवार खा.सदाशिव लोखंडे यांच्या साठी त्यांच्या सभा होणार आहेत.9 मे रोजीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जत मध्ये दुपारी 4 वाजता व पारनेर येथील बाजारतळावर सायंकाळी 6 वाजता अजित पवार यांच्या जाहीर सभांमचे आयोजन करण्यात आले आहे.भाजपा चे युवा नेते आ.नितेश राणे हे देखील 9 मे रोजीच नगर जिल्ह्यात येणार असून ते पाथर्डी येथे रॅलीत सहभागी होणार असून तसेच शेवगाव येथे कार्यकत्र्यांच्या मेळाव्यात आ.राणे मार्गदर्शन करणार आहेत.10 मे रोजी भाजपा चे वरिषेठ नेते केंद्रिय मंत्री नितिन गडकरी व केंद्रिय नागरी विमान वाहतुक मंत्री ज्योति रादित्य सिंधिया यांच्या जाहीर सभेचे श्रीगोंदा येथे सकाळी 11 वाजता सभा होणार आहे.भाजपा च्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे 10 मे रोजी पार्थी येथे जाहीर सभेत मार्गदर्शन करणार आहेत.11 मे रोजी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजते भव्य रॅली व प्रचार सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे.एकूणच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपाचे दिग्गज नेते प्रचारासाठी नगर जिल्ह्यात येणार असल्याने वातावरण चांगलेच ढवळून निघणार असून भाजपा कडून या नेत्यांच्या सभा करिता जोरदार नियोजन केले जात आहे.