Tuesday, June 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुणे अपघाताने संताप, दादा का आहात नाराज? पालकमंत्री परत या, संभाजी ब्रिगेडची साद

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 24, 2024
in maharashtra
0
पुणे अपघाताने संताप, दादा का आहात नाराज? पालकमंत्री परत या, संभाजी ब्रिगेडची साद
0
SHARES
66
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रविवारी मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगर भागामध्ये झालेल्या अपघाताने एकूणच देशांमध्ये खळबळ उडाली आहे. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने रविवारी मध्यरात्री कल्याणीनगर येथे अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया या तरुणांना आपल्या भरधाव वेगात असलेल्या कारने उडवले. यामध्ये अश्विनीचा जागीच मृत्यू झाला तर अनिशला दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. यानंतर पुण्यात आणि देशात एकच संतापाची लाट उसळली आहे.

पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडवले जात असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र गायब आहेत. हा अपघात झाल्यानंतर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे हे देखील हजर झाले होते. यावरून सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका होत आहे. मात्र सुनील टिंगरे यांनी हा आपल्याला बदनाम करण्याचा डाव असल्याचं म्हणत सर्व आरोप खोडून काढले आहेत. तर दुसरीकडे पालकमंत्री अजित पवार हे आपल्या कार्यतत्पर्तने प्रशासनाला हादरवून सोडण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत, असं असताना या प्रकरणात अजित पवार हे पुण्यात फिरकले देखील नसल्याने आता थेट पालकमंत्र्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सामान्य पुणेकर रस्त्यावर येऊन श्रीमंतासाठी वेगळा न्याय आणि गरिबासाठी वेगळा न्याय आहे का असं विचारत असताना आणि एकूणच पुण्यात संतापाची प्रचंड लाट उसळली असतात पालकमंत्री पुण्याकडे फिरकले देखील का नाहीत? हा प्रश्न आता पुणेकर विचारत आहेत.

 

त्यानंतर आता संभाजी ब्रिगेडकडून देखील अजित पवारांना हाच सवाल केला आहे. ‘पालकमंत्री महोदय, का नाराज आहात? जिथे असाल तिथून परत या? पुण्यात एवढी अपघाताची गंभीर घटना घडवून सुद्धा पुण्याचे पालकमंत्री कुठे गायब आहेत? पुणेकरांचा जीव? पुण्याची प्रतिष्ठा? महाराष्ट्राची इज्जत? ही पालकमंत्र्यांना महत्त्वाची वाटत नाही का? राज्याचे गृहमंत्री पुण्यात येऊन पत्रकार परिषद घेऊन जातात. पोलिसांना आदेश देतात? पालकमंत्री मात्र गायब आहेत? मत मागण्यासाठी आले आणि संकट काळात एकट सोडून गेले. पुणे कार एक्सीडेंट प्रकरण भयंकर असताना सुद्धा अजून मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली पाहिजे! परंतु कोणीही चकार शब्द काढत नाही. पालकमंत्री नाराज असतील तर त्यांनी सांगावं. अजून काय राजकीय वेगळा निर्णय घ्यायचा असेल तो घ्यावा? परंतु पुण्यात परत यावं.’ असा टोला संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी लगावला आहे.

 

दरम्यान, अल्पवयीन आरोपी हा कोझी रेस्टॉरंट आणि ब्लॅक क्लबमध्ये गेला होता. तिथून परतत असताना त्यानं पोर्शे कार भरधाव वेगात पळवली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून सध्या या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. आरोपीचं घर ते कोझी रेस्टॉरंट, ब्लॅक क्लब ते अपघातस्थळ या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज गोळा केलं जात आहे.

Post Views: 39
Previous Post

भारतीय शेअर बाजाराची आगेकूच, सेन्सेक्स-निफ्टीने गाठले नवीन शिखर

Next Post

जाधव कुटुंब पाकिस्तानात जपतेय मराठी संस्कृती, लोक म्हणतायेत, पेशावर ते तंजावर अवघा मुलुख आपला

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
जाधव कुटुंब पाकिस्तानात जपतेय मराठी संस्कृती, लोक म्हणतायेत, पेशावर ते तंजावर अवघा मुलुख आपला

जाधव कुटुंब पाकिस्तानात जपतेय मराठी संस्कृती, लोक म्हणतायेत, पेशावर ते तंजावर अवघा मुलुख आपला

ताज्या बातम्या

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

June 15, 2026

सांगोला पोलिसांची अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

June 14, 2026

गोंदवले मसवड देवदर्शन करून येणाऱ्या पंढरपूरच्या भाविकांच्या पिकप ला अपघात पिकप विहिरीत पडून ८ जणांचा मृत्यू ७ जण जखमी  !

June 14, 2026

छोटा हत्ती विहीरीत पडुन  आठ जणांचा दुर्दैवी मृत्यु

June 14, 2026
प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

June 14, 2026
योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

June 14, 2026
लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

June 14, 2026
श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

June 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0911662

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697