Sunday, July 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विदर्भात उन्हाचा प्रकोप कायम! पुढील दोन दिवस तीव्र उष्णतेची लाट, तर काही जिल्ह्यात अवकाळी ढग

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 31, 2024
in maharashtra
0
विदर्भात उन्हाचा प्रकोप कायम! पुढील दोन दिवस तीव्र उष्णतेची लाट, तर काही जिल्ह्यात अवकाळी ढग
0
SHARES
38
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सध्या राज्यासह देशातील बहुतांश भागात उन्हाचा प्रकोप आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. तर दुसरीकडे विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेचा पारा  रोज नवे उच्चांक गाठत आहे. वाढत्या उन्हाचा धोका लक्षात जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून गरज नसल्यास दुपारी घरातून बाहेर न निघण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर अलिकडे उष्माघाताच्या संख्येतही विलक्षण वाढ झाली आहे. असे असताना विदर्भात पुढील काही दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार असून काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकट देखील राहणार आहे. तर पुढील पुढील 24 तासात विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील विलग झालेल्या भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची दाट शक्यता नागपूर प्रदेशिक हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

विदर्भात तीव्र उष्णतेची लाट, तर काही भागात अवकाळी ढग

आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे. तर उद्या 1 जून ते 4 जून पर्यंत विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसासह 40-50 किमी प्रती तास सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज नागपुर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. उद्या 1 जून रोजी विदर्भातील  वर्धा, नागपूर, चंद्रपूर येथे उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे तर 2 जून रोजी वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रती तास सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज  व्यक्त करण्यात आला आहे. तर पुढे 3 जून रोजी हीच परिस्थिती संपूर्ण विदर्भात कायम असणार आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

चंद्रपूरचा पारा 45.6 अंश सेल्सिअसवर

नागपुर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, आज विदर्भातील सर्वाधिक तापमान हे चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर  भंडारा येथे 45.3, तर गडचिरोली आणि वर्धा येथे 45 अंश सेल्सिअस तापमानची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नागपूर शहरात उष्माघाताने मृत्यू पावलेल्या संशयित मृत्यूच्या तपासणीला घेऊन आज नागपूरात बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उष्माघाताच्या मृत्यू संदर्भात अहवाल देण्यात येणार आहे. सध्या नागपूर महानगर पालिकेने 3 संशयित मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती नोंदवली आहे.

सध्या फक्त विदर्भातच नाही राज्यात अन् देशात सर्वत्र उन्हाचा प्रकोप आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. तर दुसरीकडे विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेचा पारा  रोज नवे उच्चांक गाठत आहे. वाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेता अकोला जिल्ह्यात आज 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या दिवसा सूर्यदेवाचा कोप इतका असतो की, लोकांना घरातून बाहेर पडणेही कठीण होत आहे. त्यामुळे ही जमावबंदी पुढेही कायम राहते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दुपारच्या वेळी मुख्य रस्त्यांवरही भयाण शांतात

फक्त दुपारीच नाही तर सकाळपासूनच  उन्हाचा पारा एवढा वाढलेला असतो की, लोकांना घराबाहेर पडण्यापूर्वी विचार करावा लागत आहे. परिणामी अनेक शहरात दुपारच्या वेळी मुख्य रस्त्यांवरही भयाण शांतात बघायला मिळत आहे. तर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरही उष्ण वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेनं वैदर्भीयांचे पुरते हालेहाल केल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.

Post Views: 29
Previous Post

सरकारी नोकरीत पदोन्नती अधिकार नाही- सर्वोच्च न्यायालय

Next Post

विठ्ठल मंदिराच्या गुप्त तळघरात सापडल्या प्राचीन मूर्ती, 12 ते 13 व्या शतकातील मूर्ती असल्याचा दावा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
विठ्ठल मंदिराच्या गुप्त तळघरात सापडल्या प्राचीन मूर्ती, 12 ते 13 व्या शतकातील मूर्ती असल्याचा दावा

विठ्ठल मंदिराच्या गुप्त तळघरात सापडल्या प्राचीन मूर्ती, 12 ते 13 व्या शतकातील मूर्ती असल्याचा दावा

ताज्या बातम्या

सांगोला येथे १५ लाखांचा भेसळयुक्त दुधसाठा जप्त;अन्न व औषध प्रशासनाची कारवाई #viral #solapurnews

July 11, 2026
चौफेर विकास कामामुळे अक्कलकोट तीर्थ क्षेत्र विकासला चालना – उद्योग मंत्री उदय सामंत

चौफेर विकास कामामुळे अक्कलकोट तीर्थ क्षेत्र विकासला चालना – उद्योग मंत्री उदय सामंत

July 11, 2026

सीतामाय तलावातून पाणीपुरवठा सुरू करा

July 11, 2026
ग्रामीण भागात चोऱ्यांच्या सत्राला चाप! पोलिसांकडून ‘ग्राम सुरक्षा दला’ला काठी व शिट्टीचे वाटप

ग्रामीण भागात चोऱ्यांच्या सत्राला चाप! पोलिसांकडून ‘ग्राम सुरक्षा दला’ला काठी व शिट्टीचे वाटप

July 11, 2026
घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; दोन सराईत चोरटे जेरबंद – ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; दोन सराईत चोरटे जेरबंद – ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

July 11, 2026

श्री न.फु.शहा कोठारी प्रशालेत पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहात संपन्न

July 11, 2026
करकंब येथे सुवासिनी पूजन आणि श्री.चौंडेश्वरी भावई उत्सव

करकंब येथे सुवासिनी पूजन आणि श्री.चौंडेश्वरी भावई उत्सव

July 11, 2026
वेळापूर पालखी तळावर जिल्हा प्रशासनाकडून मॉक ड्रिल

वेळापूर पालखी तळावर जिल्हा प्रशासनाकडून मॉक ड्रिल

July 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0971507

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!