भोकर(प्रतिनिधी)मागील चार महिन्यापासून शहरातील विजपूरवठा दिवसभरातून चार ते पाच वेळा बंद पडत असून कोणतेही कारण नसताना अचानक विजपूरवठा खंडीत होत असल्याने ग्राहकांना व शहरातील व्यापार्यांना याचा नाहक त्रास सोसावा लागत असून याकडे संबधित कार्यकारी अभियंत्याचे साफ दूर्लक्ष दिसून येते.
भोकर विजवितरण विभागाच्या ढिसाळ नियोजनामूळे मागील कांहि दिवसापासून विजपूरवठा खंडीत होण्याचा प्रकार वाढला असून संबधित विभागातील कर्मचारी फोन लावला तर फोन उचलत नाहीत पाऊस वारा नसताना विज गूल होत आहे दररोज विजपूरवठा खंडित होत असल्याने ग्राहक व्यापार्यांना नाहक त्रास होत आहे संबधित विभागाचे कार्यकारी अभियंता याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करित असल्याचे दिसते विजवितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी भोकर विज वितरण विभागाच्या ढिसाळ कारभाराकडे लक्ष देवून कारभार सूधारण्याच्या सूचना देवून खंडित होत असलेला विजपूरवठा सूरळीत करण्यात यावा अशी मागणी भोकर शहरातील ग्राहक करित आहेत.