गट ग्रामपंचायत नांदखेडा जिल्हा परिषद शाळेमध्ये आज १५ वित्त आयोगाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा नांदखेडा यांच्यासाठी कपाट टेबल खुर्च्या फॅन व अन्य फर्निचर देण्यात आले .
तभा वृत्तसेवा
टेंभुर्णी/ प्रतिनिधी
जाफराबाद तालुक्यातील नांदखेडा येथील निसर्गरम्य वातावरणामध्ये जिल्हा परिषद शाळा असून त्यामध्ये सीसीटीव्ही प्रोजेक्ट सर्व खेळाचे साहित्य लवकर देण्यात येणार आहे, सरपंच बाबासाहेब सवडे यांनी स्वतःचा मुलगा स्वामी विवेकानंद हायस्कूल देऊळगाव राजा येथे शिक्षण घेत होता गोर गरीबांची शाळा आहे त्यांनी हे लक्षात घेऊन आपला मुलगा जिल्हा परिषद शाळा नांदखेडा येथे प्रवेश घेतला व जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा म्हणून निर्माण करण्याचे स्वप्न लवकरच गावकऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण करू असे
आश्वासन सरपंच बाबासाहेब पाटील सवडे, उपसरपंच भरत जाधव,ग्रा.प.सदस्य अरुण सवडे,ग्रा.प.सदस्य राजु वाघ,ग्रा.प.सदस्य योगेश सवडे, ग्रा.प.सदस्य रामु जाधव,ग्रा.प.सदस्य दत्तु बंगाळे,ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर डिघोळे,ग्रा.प.सदस्य अनिल जायभाये, समाधान सरोदे,ग्रामसेवक मदन डोईफोडे, मुख्याध्यापक संदीप ताठे,मनसे सरचिटणीस पंढरीनाथ म्हस्के,संजय हिवाळे,मारोती सवडे, संदीप हिवाळे,मनोहर हिवाळे,ग्रा.प.कर्मचारी अन्ना कांबळे, बाबुराव हिवाळे,आदींची उपस्थिती होती,