येवता:प्रतिनिधी:२५ रोजी केज तालुक्यातील लव्हूरी केंद्राची केंद्रस्तीय बैठक माध्यमिक शाळा येवता येथे दुपारी १२:३०ते ०४: ३० वा. आयोजीत करण्यात आली बैठकीस प्रमुख मार्गदर्शन जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, सुनिलराव केंद्र यांनी लव्हूरी केंद्रातील जि.प.प्रा.४२ शाळेचे मुख्याधापक व १०४ शिक्षक बैठकीस उपस्थित होते.
केंद्रे म्हणाले की विधार्थ्याची शैक्षणिक गुणत्ता वाढविण्याची सर्व शिक्षकांडून अपेक्षा केली शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहावे शिक्षकांच्या आलेल्या किरकोळ रजा तात्काळ मान्य करून त्याची माहिती सादर करण्याची सुचना केंद्रीय मुख्याधापक केली, सर्व शिक्षकांची स्वतःउपस्थीती घेतली. मराठी,गणित व इग्रजी या विषयाची अध्यय निषपत्ती,शाळा व्यवस्थापन समिती व इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले,प्रस्थाविक केंद्रप्रमुख राधाकृष्ण कांबळे यांनी केले सुत्रसंचलन विक्रम डोईफडे यांनी केले.