भोकरदन ते जयदेव वाडी एसटी बस पूर्वीप्रमाणे दोन फेऱ्या सुरू करा!
आम आदमी पार्टीचे जाफ्राबाद बस डेपो मॅनेजरला निवेदन
भोकरदन : कोरोना काळाच्या अगोदर भोकरदन ते जयदेव वाडी बसच्या दोन फेऱ्या होत्या त्यापूर्वी प्रमाणे सुरू करण्यासाठी आज मा. डेपो मॅनेजर, एसटी बस डेपो जाफराबाद यांना आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील सोळंके भागवत सखाराम भोंबे यांनी पत्र दिले असून भोकरदन मार्गे वाकडी कोकडी आन्वा आडगाव,शिवना, जाईचा देव मुक्कामी जाणारी गाडी पूर्वीप्रमाणे चालू करण्याची मागणी केलेली आहे.
कोरोना काळामध्ये ही बस बंद करण्यात आली. तेव्हापासून ही बस बंदच आहे. त्यामुळे प्रवाशांची अतिशय गैरसोय होत आहे.ही बस सुरू करण्यासाठी संबंधितांनी प्रस्ताव पाठवुन पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे. तरी ठरावांचा आणि जनतेच्या अडचणीचा विचार करून जाफराबाद ते जयदेव वाडी बसच्या दोन फेऱ्या पूर्वीप्रमाणे सुरू कराव्यात. अन्यथा ना विलाजाने आम आदमी पार्टी तर्फे आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल. याची सर्वस्वी जबाबदारी डेपो मॅनेजरची राहील याची नोंद घेण्यात यावी. असा इशारा देण्यात आलेला आहे.