अर्धापूर शहरात एज्युव्हीजन इंग्लिश स्कूलमध्ये ग्रीन डे उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांनी हिरवे रंगाचे कपडे घालून नोंदविला सहभाग
अर्धापूर शहरातील श्री रावते सरांचे एज्युव्हीजन प्री प्रायमरी स्कूल मध्ये ग्रीन कलर डे उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचे ड्रेस घालून कार्यक्रमात सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना हिरव्या रंगाबद्दल माहिती सांगण्यात आली तसेच हिरव्या रंगातील विविध वस्तूंची पदार्थांची भाजीपाल्यांची , नवनवीन गोष्टींची ओळख करून देण्यात आली व महत्त्व पटवून दिले. या दिवसानिमित्त शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये हिरवा रंग ज्या ज्या वस्तूंचे, प्राण्यांचे, भाजीपाला इत्यादींची चित्रे रंगविण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना हिरव्या रंगाची मिठाई देऊन करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील श्रेया मिस, अल्का मिस ,अंजली मिस, छाया मिस, प्रियंका मिस, गिल मिस,पुरी सर यांनी परिश्रम घेतले, तसेच या यशाबद्दल शाळेचे HOD प्रतीक सर आणि प्राचार्य सौ प्रिया रावते मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले