तभा वृत्तसेवा
विष्णु मगर
टेंभुर्णी/ प्रतिनिधी
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री संत सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहात मोठ्या संख्येने गावातील सर्व जाती धर्माचे भाविक सहभागी झाले होते. या सप्ताहाच्या निमित्ताने संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीदिवशी शनिवार रोजी काल्याचे किर्तन नंतर गावातुन भव्य दिव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली.
यामध्ये टेंभुर्णी पंचक्रोशीतील हजारो भाविकांसह गावातील विविध दिंड्या सहभागी होऊन या सोहळ्याची रंगत आणली होती.
प्रत्येक दिंडीमध्ये विविध वेशभूषा करून नाथांची भारुड, गौळण व अंभग गाऊन प्रत्येक दिंडीने भाविकांना मंत्रमुग्ध केले.
यामध्ये आकर्षक राहिले ते कौसाबाई मैद यांच्या नाथांचे वैदीनिचे भारुडाने सर्व उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
या पालखी मिरवणूकीत नंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली. भव्य दिव्य अशा धार्मिक कार्यक्रमात टेंभुर्णी भक्त दंग झाले होते. संपूर्ण गावकऱ्यांनी आनंदाने सात दिवस सप्ताह मध्ये सहभागी होऊन मनसोक्त भक्ती मय वातावरणात भक्ताची मांदियाळी पाहवायास मिळाली.