[] संभाजीनगर येथील आरक्षण बचाव यात्रेत एससी एसटी ओबीसी बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हा []
हदगाव तालुका प्रतिनिधी :-
गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले असल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी २५ जुलै रोजी मुंबई पासून महाराष्ट्र भर एस. सी, एस. टी. ओबीसी यांच्या हक्काच्या लढाईत आरक्षण वाचवण्यासाठी काढलेल्या यात्रेला ओबीसी समाज बांधवाकडुन चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या नेतृत्वात या यात्रेचा समारोप म्हणून मंडल विजय दिवसानिमीत्य संभाजीनगर येथे बुधवार ७ आगष्ट रोजी जामा मशिदी जवळ आमखास मैदानावर दुपारी एक वाजता आरक्षण बचाव यात्रेचा समारोप कार्यक्रमास हदगांव – हिमायतनगर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुक्यातील एससी, एस टी , ओबीसी समाजातील नेते मंडळीसह ओबीसी नेते बालाजी खरडे चिंचगव्हानकर यांनी केले आहे.