अर्धापूर : गेल्या काही दिवसात तालुक्यात अवैध दारू विक्री ने डोके वर काढले होते. अर्धापूर पोलीसांनी रविवारी सात ठिकाणी धाड टाकून कार्यवाही केली आहे. रात्री उशिरापर्यंत धाड टाकणे सुरू आसल्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यातील अवैध दारु विक्री गत काही दिवसात अवैध दारू विक्रीचा धंदा फोफावला होता. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अर्धापूर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीतील एकाच दिवसात अचानकपणे सात ठिकाणी धाड टाकून काही जणांवर कार्यवाही केली आहे. यात बाबुराव महादू हेमलर वय २३ वर्षे रा. लोण याच्याकडून देशी दारु भिंगरी संत्राचे १८० एमएल चे एकूण ९ सीलबंद बॉटल प्रत्येकी किंमत ७० रुपये प्रमाणे असा एकूण ६३० रुपयांचा माल पकडला आहे.
नवनाथ केशवराव कपाटे (वय-२९ वर्षे रा. येळेगाव) याच्याकडून देशी दारु भिंगरी संत्राचे १४ बॉटल ९८० रूपयांचा माल पकडला आहे. लक्ष्मण चंपती कांबळे (वय-३० रा.पार्डी) याच्याकडून दारू भिंगरी संत्राचे एकूण ९ सीलबंद बॉटल ६९० रुपयांचा माल पकडला आहे. बाबू नारायण खंदारे (वय-४३ वर्षे रा. धामदरी) येथून देशी दारु भिंगरी संत्राचे २० बॉटल १४०० रुपयाचा माल पकडला आहे. नरेंस सूर्यवंशी (वय-२९ वर्षे भोकर फाटा येथून देशी दारू भिंगरी १५ सीलबंद बॉटल १०५० रुपयांचा माल पकडला आहे. श्रीकांत परशराम लिंगाला (वय-३६ वर्षे रा. नारायणपूर ता. श्रीशिला जि. करीम नगर) याच्याकडून ह.मु. लहान येथून ८ बॉटल ५६० रुपयांचा माल पकडला आहे. गजानन गव्हाणे (वय- वर्षे रा. कलदगाव ता. अर्धापुर) याच्याकडून येळेगाव कॉर्नर येथे देशी दारू १० बॉटल प्रत्येकी ७०० रुपयांच्या मालासह पकडला आहे. असा एकूण देशी दारू भिंगरी संत्राचे एमएल च्या एकूण ८५ बॉटल प्रत्येकी किंमत ७० रुपये प्रमाणे असा एकूण ५ हजार ९५० रुपयांचा माल पकडला आहे. रात्री उशिरापर्यंत ही कार्यवाही सुरूच होती.
@@प्रतिक्रिया @@
अर्धापूर पोलीस ठाणे हद्दीत अवैध जुगार, मटका , गुटखा व दारू विक्री संदर्भाने कुठे सुरू असल्यास मला व्यक्तिशः व्हाट्सएप क्रमांकावर सांगा किंवा संपर्क करावा पोलीस नक्कीच कार्यवाही करेल.
– चंद्रशेखर कदम
पोलीस निरीक्षक अर्धापूर