स्मृतिचिन्हासह 9 विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके.
तभा वृत्तसेवा
टेंभुर्णी/ प्रतिनिधी
टेंभुर्णी ता जाफराबाद येथील नवभारत शिक्षण संस्था,जेबीके विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कै बापूराव पाटील कळंबे सेवाभावी संस्था व स्मृति प्रतिष्ठाण,युगंधर प्रतिष्ठान च्या वतीने स्वातंत्र्यदिनी गुणवंत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गेल्या 5 वर्षापासून संस्था हा उपक्रम राबवत असून ह्या उपक्रमाचे हे 6 वे वर्ष आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवभारत चे अध्यक्ष संजय काबरा होते तर यावेळी उपाध्यक्ष जमीर शेख,सचिव सत्यनारायण सोनी,सरपंच गौतम म्हस्के , युगंधर चे अध्यक्ष तथा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन विनोद कळंबे,प्राचार्य नंदकुमार काळे. संचालक मधुकर निकम, सुखदेव पवार, लक्ष्मीकांत बुकदाने,मनोहर घोडके,प्रा दत्ता देशमुख, विश्वनाथ सांगुळे,दिलीप उभरहंडे, प्रा मधुकर झटे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
दहावी,बारावी कला व विज्ञान शाखेतून प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख 701/501/301 व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दहावीतून प्रथम युवराज कैलास जाधव,द्वितीय
कु.समीक्षा संजय साबळे,तृतीय
कु.ईश्वरी नारायण जमधडे, बारावी कला शाखेतून प्रथम कु ऋतुजा शांताराम पवार, द्वितीय पुजा गजानन म्हस्के,तृतीय तानाजी वामन भालेकर ,बारावी विज्ञान शाखेतून प्रथम कु भाग्यश्री हरी धनवई,द्वितीय कुमारी भूमिका गजानन बुजाडे,तृतीय
कु.अनुराधा कृष्णा भोरे यांचा सत्कार करण्यात आला.संस्थेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य व प्रेरणादायी असल्याचे यावेळी संजय काबरा म्हणाले.सूत्रसंचलन सखाराम बोरकर यांनी तर आभार प्रा अरुण आहेर यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी ,पालक उपस्थित होते.