वाळूज महानगर (प्रतिनिधी) : जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र सेवेवर हजर असणारे पोलीस बांधव यांना वाळूज महानगर परिसरातील विद्यार्थिनींनी राख्या बांधून विद्यार्थिनी महिला व तरुणींची रक्षा करण्याची ओवाळणी मागितली ,यावेळी पोलीस निरीक्षक कृष्णा चंद्र शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत केव्हाही आवाज द्या ,कॉल करा मी व माझा संपूर्ण स्टाफ तुमच्या सेवेसाठी 24 तास हजर आहे असे आश्वासन दिले.
आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात रक्षा बंधन निमीत्त कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता, आयोजीत कार्यक्रमास श्री गजानन विद्या मंदिर आणि वसंतराव पाटील इंग्लिश स्कुल, रांजणगांव शेणपुंजी येथील विद्यार्थीनींनी कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांना राखी बांधुन त्यांचे औक्षण केले, सदर वेळी उपस्थीत विद्यार्थीनींना सायबर सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन सोशल मिडीयाचा वापर करतांना आपण व आपले पालकांनी काय कारावे? व काय करु नये?, यासह फसवणुक करण्याच्या उद्देशाने आलेले मॅसेजेसला रिप्लाय देवू नये,
सोशल मिडीयावर कोणत्याही आमीषास बळी पडु नये, तसेच विद्यार्थीनींनी कोणताही अनुचीत प्रकार घडत असल्यास तात्काळ शाळेतील शिक्षक, पालक किंवा पोलीसांना डायल 112 या क्रमांकावर संपर्क साधावाअसे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे यांनी मार्गदर्शनपर सुचना देण्यात केल्या, यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सपोनि गिते, पो.उप.नि. अबुज, सफौ अशोक जाधव, कडु, किशोर घुसळे, रेखा चांदे, विक्रम वाघ, योगेश शेळके, राजाभाऊ कोल्हे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.