तभा फ्लॅश न्यूज/अक्कलकोट : कल्याणशेट्टी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रबोधिनी विभागाच्यावतीने श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्राध्यापिकांनी राखी बांधून त्यांचा आनंद द्विगुणित केला.
स्वामी समर्थ समाधी मठ परिसरात राखी पौर्णिमेनिमित्त रक्षाबंधनाचा उपक्रम प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रबोधिनीचे चेअरमन प्रा डॉ बाळासाहेब पाटील, प्रा सौरभ भस्मे, प्रा मधुबाला लोणारी, प्रा शीतल फुटाणे,बालाजी कांबळे उपस्थित होते.
स्वामी भक्तांना प्रा विद्याश्री वाले, प्रा विद्या बिराजदार यांनी राख्या बांधल्या. आज खरंच आम्हाला आमची बहीणच भेटली आहे, अशी भावना स्वामीभक्तांनी व्यक्त केल्या.
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष विद्यमान आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, जूनियर महाविद्यालय विज्ञान विभाग प्रमुख पुनम कोकळगी सेमी इंग्लिश विभाग प्रमुख रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी कौतुक केले.
मुंबई, पुणे, रोहा व नाशिकच्या भाविकांनी बांधून घेतल्या राख्या
कल्याणशेट्टी महाविद्यालयातील प्राध्यापिकांकडून स्वामी समर्थ समाधी मठ परिसरात दर्शनासाठी आलेल्या मुंबई, पुणे, रोहा व नाशिक येथील भाविकांनी आवर्जून प्राध्यापिकांकडून राख्या बांधून घेतल्या. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव दिसत होते.
भाविकांनी केले प्राध्यापिकांचे कौतुक
उच्चशिक्षित प्राध्यापिका राखी बांधण्यासाठी आवर्जून आल्या हे पाहून उपस्थित भाविकांनी कल्याणशेट्टी महाविद्यालयातील प्राध्यापिकांचे कौतुक केले. आम्हाला राखी पौर्णिमेनिमित्त बहिणी मिळाल्या अशा भावना एका भाविकांने व्यक्त केल्या.
Post Views: 32