सोलापूर – मागास समाज सेवा मंडळ संचलित जागृती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला नेहरूनगर येथे ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजयरत्न चव्हाण हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती विजय जाधव उपस्थित होते.
प्रशालेचे क्रीडा शिक्षक संतोष जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर उद्योगपती विजय जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाविषयी मनोगत सादर केले आणि देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात प्राचार्यांनीसुद्धा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग उपस्थित होते.

























