तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजने बदल होणार असून १५०० पेक्षा जास्त लाभ देण्याची माहिती दिली आहे.
ही योजना महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. अनेक महिलांनी या निधीचा वापर छोट्या व्यवसायासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी केला आहे. ग्रामीण भागात तर ही योजना अनेक कुटुंबांसाठी ‘आर्थिक आधारस्तंभ’ ठरली आहे.
या योजनांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो, रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. विशेषत: ज्या घरांत स्थिर उत्पन्नाचे साधन नाही, त्या घरांमध्ये या योजनेचे पैसे खूप मोठा दिलासा ठरतात.

















