सोलापूर – मंद्रुप अप्पर तहसीलअंतर्गत सर्वाधिक शेतकरी खातेदार असणार्या मंद्रुपमधील अथिवृष्टी बाधित शेतीचे पंचनामे अंतिम टप्यात आली आहेत. तलाठी रावसाहेब कोकरे व कृषी सहायक रमेश फरताडे, उमेश कोळी यांच्याकडून पंकनामा जलद गतीने करण्यासाठी प्रयत्न सूरू आहे. या पंचनाम्यासाठी ग्रामसेवक नागेश जोडमोटे गैरहजर असल्याने पंचनाम्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पंचनाम्यास विलंब होत आहे.
मंद्रुपमध्ये दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे शेतकरी खातेदार आहेत. क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने महसूल व कृषी कर्मचार्यांना प्रत्यक्ष क्षेत्र पाहणी करून पंचनामा करण्यास विलंब होत आहे. शिवाय अनेक शेतीत पावसाचे पाणी असल्याने नुकसान पाहणी करण्यास अडचणी येत होते. म्हणून पंचनाम्यास विलंब होत आहे.
प्रत्यक्ष नुकसान पाहणी करूनच पंचनामा करण्यात येत असल्याने व ग्रामसेवक जोडमोटे यांच्या गैरहजेरीत अनेक खातेदारांची ओळख नसल्याने पंचनामा करताना व्यत्यय येत असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले. त्यामुळे पंधरा दिवसातही मंद्रुपच्या ८० ते ९० टक्के पंचनामे पूर्ण झाली आहेत. लवकरच सर्व शेतकर्यांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई मिळवून देणार असल्याचे तलाठी व कृषी सहायक फरताडे यांनी सांगितले.



















