Sunday, September 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल; सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तरुण भारतbyतरुण भारत
October 30, 2025
in maharashtra
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे -: ‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’ या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनस्थळांचे महत्व अधोरेखित होईल आणि पर्यटकांची संख्या वाढेल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच प्रदूषणावर मात करत पुण्याची “सायकलचे शहर” ही ओळख पुन्हा प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्य शासन, पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’ चे बोधचिन्ह व जर्सी अनावरण समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, आशियाई सायकलिंग महासंघाचे माजी महासचिव ओंकारसिंग, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सायकलचे माहेरघर असलेल्या पुण्यात खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. प्रदूषण आणि जीवनशैलीतील बदलांमुळे उद्भवणाऱ्या आजारांचा विचार करता सायकल चालविण्याला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. जगभरात सायकलस्वारांचा आदराने गौरव केला जातो. या पार्श्वभूमीवर ‘पुणे ग्रॅण्ड टूर’ सायकलिंग संस्कृतीला नवा आयाम देईल.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही स्पर्धा पुण्याला जगाच्या नकाशावर घेऊन जाणारी ठरेल. देशात सायकल श्रीमंताचे वाहन म्हणून दीडशे वर्षांपूर्वी आली होती. त्यावेळी सायकल वापरण्यासाठी परवाना  लागायचा. पुण्यात १९४७ साली पहिली सायकल स्पर्धा झाली होती. त्यामुळे पुण्याची ओळख ‘सायकलचे शहर’ म्हणून होती, आणि ही सायकल संस्कृती आजही शहराच्या अभिमानाचा भाग आहे. जागतिक वेळापत्रकात या स्पर्धेचा समावेश झाल्याने तिचे आयोजन अत्यंत यशस्वी ठरेल आणि ही स्पर्धा देशासाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्याच्या ७७ वर्षीय सायकलपटू निरुपमा भावे, प्रीती म्हस्के, अहिल्यानगरच्या प्रणिती सोमण, छत्रपती संभाजीनगरचे भारत सोनवणे, जळगावचे आकाश म्हेत्रे आणि सोलापूरच्या पूजा दानोळे यांच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांचे अभिनंदन केले.

सायकल स्पर्धा आरोग्य, रोजगार, पर्यटन आणि विकासाचा एकत्रित महोत्सव ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ऐतिहासिक वारसा असलेल्या पुण्यातून ग्रॅण्ड चॅलेंज टूर सुरू होत असल्याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगातून जाणाऱ्या २०० हून अधिक गावांमधून ही खडतर स्पर्धा होणार आहे. ‘टूर द फ्रान्स’पासून प्रेरणा घेत आयोजित होणारी ही स्पर्धा म्हणजे केवळ क्रीडा नाही, तर पर्यावरण, आरोग्य आणि शाश्वत जीवनशैलीचे प्रतिक आहे.

या स्पर्धेसाठी भिमाशंकर, महाबळेश्वर आणि भंडारदरा परिसरातील ‘भारतीय शेकरू’ या दुर्मिळ प्रजातीवर आधारित बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. याद्वारे ग्रामीण पर्यटनाला चालना मिळून रोजगारनिर्मिती होईल व राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. ही स्पर्धा म्हणजे आरोग्य, रोजगार, पर्यटन आणि विकासाचा एकत्रित महोत्सव ठरेल, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन होत असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्र्यांनी अल्पावधीत केलेल्या तयारीबद्दल जिल्हा प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणांचे अभिनंदन केले. तसेच स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री खडसे म्हणाल्या, देशात २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आहे. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताकडे वाटचाल करताना क्रीडा क्षेत्राचा वाटा मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. रविवारी ५ ते ६ हजार ठिकाणी ‘सायकल ऑन संडे’ उपक्रम संपूर्ण देशभर राबविला जात आहे, ज्यामध्ये सुमारे ५ लाख सायकलपटू सहभागी होतात. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘फिट इंडिया’हे स्वप्न पूर्ण होणार आहे.

केंद्र सरकारचे क्रीडा धोरण हे क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून देशभर पुढे नेण्यावर केंद्रित आहे. महाराष्ट्रात विविध पर्यटनस्थळे असल्याने ‘पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूर’च्या माध्यमातून क्रीडा पर्यटनाचे उत्तम उदाहरण देशभर दिले जाईल. क्रीडा विज्ञान हे एक नवे क्षेत्र असून, त्याद्वारे राज्यातील खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणता येईल, असेही  रक्षा खडसे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ‘पुणे ग्रॅण्ड टूर –२०२६’ची संकल्पना आणि तयारी विषयी माहिती दिली.

बोधचिन्ह, जर्सीचे अनावरण आणि शुभंकर प्रदर्शित

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व अन्य मान्यवरांच्या हस्ते ‘पुणे ग्रँड टूर -२०२६’ च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील  या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर जंगलात आढळणाऱ्या शेकरूवर ( उडती खार ) आधारित स्पर्धेचे ‘ इंदू ‘ हे शुभंकर जारी करण्यात आले.

या  कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, राहूल कुल, सिद्धार्थ शिरोळे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

‘पुणे ग्रँड टूर -२०२६ चे मुख्य प्रायोजक बजाज, प्रायोजक सिरम इन्स्टिटयूट, चितळे बंधु आणि पंचशील ग्रुप असून यावेळी त्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

Post Views: 90
Previous Post

भारताच्या जहाजबांधणी क्षेत्रात काम करण्याची आणि विस्तार करण्याची हीच योग्य वेळ : पंतप्रधान

Next Post

राज्याच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अबूधाबी पोर्ट्स ग्रुपसोबत दोन अब्ज डॉलर्सचा सामंजस्य करार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राज्याच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अबूधाबी पोर्ट्स ग्रुपसोबत दोन अब्ज डॉलर्सचा सामंजस्य करार

ताज्या बातम्या

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बार्शीतील दोघांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

September 19, 2026
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

September 19, 2026
 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

September 19, 2026

बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी द्या, शिवसेनेची मागणी

September 19, 2026

गौरी गणपती आरासमध्ये लावले पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक

September 19, 2026
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1235319

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!