Wednesday, July 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बंद दाराआड काय घडली कर्जमुक्तीची चर्चा, राजू शेट्टींनी दिली संपूर्ण माहिती

तरुण भारतbyतरुण भारत
October 31, 2025
in maharashtra
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात जवळपास दोन ते अडीच तास बैठकीपुर्वी बंद खोलीत चर्चा झाली. या बंद खोलीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, पणन मंत्री जयकुमार रावळ, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, पंकज भोयर, राज्याचे मुख्य सचिव, मुख्यमंत्र्याचे सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह राजू शेट्टी, बच्चू कडू, महादेव जानकर, वामनराव चटप, अजित नवले, मा. खासदार उन्मेश पाटील, राजन क्षीरसागरझ रविकांत तुपकर ही मंडळी या बंद दाराआड झालेल्या चर्चेत सहभागी होते.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नेहमीप्रमाणे आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे कर्जमाफी करणार आहोत. मात्र राज्य सरकारची सध्या कर्ज उचल करण्याची मर्यादा संपलेली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीसाठी जवळपास ३२ हजार कोटीची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत आहोत. त्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारवर लाडक्या बहिणीसह इतर योजनांचा कसा भार पडला आहे व आर्थिक नियोजन करत आम्ही कसे मेटाकुटीस आलो आहोत हे त्यांच्या खुमासदार शैलीत समजावून सांगत होते. त्या सर्वांच्या बोलण्यावरून अजून दोन वर्षे म्हणजेच २०२८ पर्यंत चालढकल करत रेटून नेण्याचा प्रयत्न होता.

एकंदरीत शिष्टमंडळातील सर्वच लोकांनी ठाम भुमिका घेतली कि तुम्ही सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी कधी करणार याची तारीख सांगा या मतावर आम्ही ठाम राहिलो. या दरम्यान अनेक पर्याय समोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र चर्चेअंती ३० जून २०२६ पर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय त्यांनी आम्हाला दिला. आम्ही सर्वजण ठाम होतो कि शासनाने तातडीने कर्जमाफी करावी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कि सध्या पुर व अतिवृष्टीची ३२ हजार कोटी दिल्यानंतर कर्ज मिळणार नसल्याने राज्य सरकार तातडीने पैसे कसे ऊभारायचे याबाबत पर्याय उभे करेल दरम्यान महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आल्याने या सर्व गोष्टी आचारसंहितेमध्ये पुर्ण करणे प्रशासनास अडचणीचे असणार आहे. दोन्ही निवडणुकींचे आचारसंहिता साधारण फेब्रुवारी पर्यंत संपेल त्यांनतर मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात तरतूद करून जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असा अंतिम निर्णय घेण्यात आला. एकुणच या सर्व चर्चेत या मंडळीनी बेधुंद मनमानी कारभार करत राज्य सरकारचा आर्थिक डोलारा ढासळला आहे हे मात्र निष्पन्न झाले.

गेली सहा महिने बच्चू कडू यांच्यासह राज्यातील सर्वच संघटना कर्जमाफीसाठी आंदोलने करत होती. बच्चू कडू यांनी संपुर्ण महाराष्ट्रभर महाएल्गार पुकारत आंदोलन उभे केले होते. गेल्या तीन दिवसात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर व कामगार लोक नागपूर मध्ये रस्त्यावरच ठाण मांडून बसले होते. हजारो लोक रस्त्यावरच जेवण करत होते. दिव्यांग बांधव त्याच ठिकाणी जेवण व शौचालयाचा वापर करू लागले. रात्रभर पावसाने चिखलाने रस्त्यावरील लोकांचे हाल सुरू झाले होते. या सर्व गोष्टींच्या विचाराअंती हा निर्णय मान्य करावा लागला.

चळवळीमध्ये एखादे आंदोलन केल्यानंतर परिस्थती पाहून कुठेपर्यंत ताणले पाहिजे याच्या मर्यादा आहेत. शेवटी राज्य सरकारला या आंदोलनामुळेच ३० जून २०२६ ही तारीख मान्य करावी लागली अन्यथा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती व वस्तुस्थिती पेक्षा लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून २०२८ पर्यंत चालढकल करण्याचा त्यांचा डाव होता. शेवटी या सर्व झालेल्या बंद दाराआड चर्चेनंतर सर्व मंडळी मुख्य बैठकीमध्ये आले कर्जमाफीची तारीख निश्चित करण्यात आली.

राज्य सरकारने मखलाशी करत दोन महिन्यापूर्वी कर्जमाफीची समिती गठीत करायची ठरविले होती. मात्र बैठकी आधीच कर्जमुक्तीसाठी समिती नेमण्याचा शासन निर्णय सायंकाळी पाच वाजता काढला. यावरून त्यांना चालढकल करायचे होते हे लक्षात येते मात्र आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यांनतर त्यांनी बैठकीआधी हा डाव खेळला. आता राज्य सरकारने या समितीला तातडीने अहवाल सादर करण्यास सांगितले आहेत. समितीने कर्जमाफी करत असताना सरकारी अधिकारी, उद्योजक, व्यापारी यांना वगळून किती रक्कम होईल याची खात्री करावी बाकी नियम अटी व शर्थी मध्ये अडकवू नये. मात्र राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती ३० जून पर्यंत सरकारला करावीच लागेल अन्यथा आता तहसिलदार व जिल्हाधिकारी यांच्या गाड्या फोडल्या जात आहेत ही वेळ मंत्र्याच्या गाड्यापर्यंत आली आहे हे मात्र निश्चित.

राज्यातील शेतकऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे कि थकीत कर्जाच्या तगाद्याला कंटाळून तुम्ही आत्महत्या करू नका थकीत कर्जाच्या रक्कमा ३० जून २०२६ पर्यंत सरकारने भरण्याची जबाबदारी घेतली आहे. यावरही जर कोणत्या बॅंकेने तगादा लावला तर संघटनेच्या पदाधिकारी यांना कळवा संबंधितांचा योग्य तो बंदोबस्त करू.

Post Views: 42
Previous Post

सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचा अभिनव उपक्रम, खेळाडूंसाठी विमा योजना सुरू

Next Post

संजय राऊत्यांच्या तब्बेतीत बिघाड, बाहेर जाणे किंवा गर्दीत मिसळणे यावर निर्बंध… म्हणाले नवीन वर्षात भेटेस येईन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संजय राऊत्यांच्या तब्बेतीत बिघाड, बाहेर जाणे किंवा गर्दीत मिसळणे यावर निर्बंध... म्हणाले नवीन वर्षात भेटेस येईन

ताज्या बातम्या

शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार -डॉ वडकबाळकर

July 29, 2026

सराफ बाजारात दुकानात घुसखोरी करून कामगाराला मारहाण व तोडफोड

July 29, 2026

८ पर्यावरणपूरक दाहिन्यांवर वर्षाला १.३० कोटींचा खर्च

July 29, 2026
स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

July 29, 2026

स्वामी समर्थ मंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास; आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश, म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

July 29, 2026

वीजबिलमुक्त’ पाणीपुरवठ्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल

July 29, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

July 29, 2026

दूध व्यवसायासाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत लाखोंचे अनुदान

July 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1010802

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!