जेऊर – “सोलापूर –अजमेर या गाडीला जेऊर स्थानकावर थांबा मंजूर करावा, अशी मागणी स्थानिक मा.खासदार,आमदार,मुस्लिम संघटना, प्रवासी संघटना व व्यापारी वर्गातून होत आहे.
जेऊर हे करमाळा आणि जामखेड तालुक्यांच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे. या परिसरात मुस्लिम समाजाची मोठी लोकसंख्या वास्तव्यास असून, अजमेर येथील प्रसिद्ध दरग्याला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक प्रवास करतात. सध्या या भागातून अजमेरकडे जाण्यासाठी हीच एकमेव रेल्वे सेवा उपलब्ध आहे.
तसेच जेऊर पासून ३० किलोमीटर अंतरावरील अलहज वली चाँदपाशा दर्गा देशभरातील भाविकांचे श्रद्धांस्थान आहे.त्यामुळे जेऊर स्थानकासाठी सोलापूर अजमेर रेल्वे सेवा उपयुक्त ठरणार आहे.रेल्वे प्रशासनाने जेऊर स्थानकावर येताना आणि जाताना थांबा मंजूर करावा अशी मागणी जेऊर प्रवासी असोसिएशन अध्यक्ष सुहास सुर्यवंशी यांनी केली आहे.
सुरत येथे मोठे होलसेल कपडा मार्केट आहे, येथे खरेदी – विक्रीसाठी या भागातील व्यापाऱ्यांना सतत जावे लागते त्यामुळे व्यापारी वर्गाच्या दृष्टीने या गाडीला थांबा होणे महत्त्वाचे आहे.
डॉ. कालिदास लिमकर*
*सदस्य –झोनल रेल्वे सल्लागार समिती सदस्य
सोलापूर -अजमेर -सोलापूर या साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीस जेऊर रेल्वे स्टेशनला प्रवासी थांबा मंजूर करणेसाठी प्रवासी सेवा संघाने रेल्वे प्रशासनाकडे निवेदन सादर केलेले असून विभागीय कार्यालय सोलापूर व मध्य रेल्वेचे क्षेत्रीय मुख्यालय मुंबई या कार्यालयाकडे थांबा मंजुरीकरीता सातत्याने पाठपुरावा करणेत येत आहे .
संजय पाटील
सदस्य – विभागीय रेल्वे सल्लागार समिती, सोलापूर
















