धाराशिव – आगामी काळात जिल्हा परिषदच्या निवडणूकीची चाहूल लागली असून लोहारा तालुक्यातील सास्तुर गावातील विधमान सरपंच तथा माजी. जिल्हा परिषद सदस्या शितल राहुल पाटील यांनी माकणी गटातून लढवण्याची तयारी सुरू केली असून भारतीय जनता पार्टीचे उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष राहुल पाटील हे जिल्हा परिषद सदस्य असताना केलेली विकास कामे याच्या मुळे परिसरातील नागरिकांनी २०१७ मध्ये शीतल पाटील यांना बहुमताने निवडून दिले होते, त्यावेळी त्यांनी केलेली सर्व सामान्य जनतेची कामे व विकास कामाची पावती म्हणून सास्तुर येथील जनतेने त्यांना सरपंच करून एक हाती सत्ता दिली.
परंतु सध्या सास्तुर हा गट राखीव सुटल्यामुळे जनते मध्ये लोकप्रिय व विकासाची जाण असणारे नेतृत्व म्हणून राहुल पाटील यांच्या कडे पाहिले जाते त्यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने शीतल राहुल पाटील यांना माकणी गटातून निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्याची तयारी सुरू आहे, असे खात्रीलायक माहिती सूत्राकडून मिळाली आहे.

















