नांदेड – काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे गुरुवारी आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून निवडणूकीची पुढील रणनीती ठरविण्यासाठी माहूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गडावर भेट देऊन माता श्री रेणुका देवीचे सपत्नीक दर्शन घेत महाआरती केली.यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस कमिटीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष राजेश पावडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
दर्शनानंतर त्यांनी शहरात आयोजित पक्षाच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी त्यांचा पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यथोचित सत्कार सन्मान केला. सत्कारानंतर त्यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या भेटी घेत त्यांच्याशी चर्चा करत इच्छुक उमेदवार व पक्षाचे पदाधिकारी यांची मते जाणून घेतली. आगामी निवडणुकीसाठी सर्वांना समर्पित भावनेने पक्षाचे काम करत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही आ.पटोले यांनी केले.

या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा किनवट/ माहूर विधानसभा निरीक्षक बालाजी चव्हाण, ज्येष्ठ नेते, मार्केट कमिटीचे माजी सभापती मंचकराव देशमुख, माजी पं.स. सदस्य किशनराव राठोड, वानोळा जि.प. सर्कलचे इच्छुक उमेदवार कृष्णकुमार राठोड, जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे, जेष्ठ नेते माणिकराव पाटील, माजी उपनगराध्यक्षा सौ.अश्विनी आनंद पाटील तुपदाळे, अ.भा.किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष माधव पाटील पवळे, राम रेड्डी आईटवाड,जगदीश पाटील तुपदाळे,जयकुमार अडकीने,अनिल मडपेल्लीवार, अर्धापुर प्रभारी अध्यक्ष डॉ. उत्तमराव इंगळे,अर्धापुर काँग्रेस ता.उपाध्यक्ष बळीराम पाटील हटेकर,युवक काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र डहाळे, राजु सौंदलकर,निसार कुरेशी, अजीम सैय्यद,जब्बार शेख, जब्बार भाई,संजय गायकवाड, शेख अली,सादिक शेख,जमीर खान,मन्नाण शेख, शरीफ शेख, ब्रम्हा हानवते आदी पदाधिकारी यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

















