पंढरपूर – चैतन्यसद्गुरू तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा वारकरी पुरस्कार प्रमोदमहाराज जगताप यांना जाहीर झाला आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
वारकरी पंथाचे थोर सत्पुरुष चैतन्यसद्गुरू तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी वारकरी पंथाची सेवा करणाऱ्या सेवानिष्ठ विभूतीला ” वारकरी पुरस्कार ” प्रदान केला जातो. यावर्षीचा हा वारकरी पंथातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार संत साहित्याचे साक्षेपी तत्वचिंतक श्रीगुरु प्रमोदमहाराज जगताप यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण श्रीक्षेत्र पंढरीत सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र, महावस्त्र, श्रद्धानिधी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीज्ञानराज प्रतिष्ठान मुंबई यांनी केले आहे.
———————-
संतपेठेतील वासकर वाडा येथे पुरस्कार सोहळा –
श्रीगुरु विठ्ठल महाराज वासकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्रीगुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या हस्ते सोमवारी (दि.३ नोव्हेंबर ) दुपारी दोन वाजता वासकर वाडा संतपेठ पंढरपूर येथे पुरस्कार वितरण होणार आहे.

















