नांदेड – आंबेडकर चळवळीतील युवा कार्यकर्ते सम्राट आढाव यांनी हाडको येथील स्वाभिमानी निर्धार मेळावा कार्यक्रम प्रसंगी युवकांचे आयकॉन सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. हडको येथे आयोजित स्वाभिमानी निर्धार मेळाव्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील युवा कार्यकर्ते सम्राट आढाव यांनी दिनांक १ नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.
आगामी स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वाभिमानी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास संबोधित करण्यासाठी युवकाचे आयकॉन सुजाता आंबेडकर हे उपस्थित होते.
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी सक्षम असल्याचे सांगून निष्ठा म्हणताना तिकीट दिल्या जाईल असेही सांगितले. यावेळी युवा कार्यकर्ते सम्राट आढाव यांचा पक्षप्रवेश झाल्याने सिडको हडको परिसरातुन वंचित बहुजन आघाडीस सक्षम होण्यास मदत होईल.
पक्षप्रवेश कार्यक्रम यावेळी प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद, युवा प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे, शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे, विठ्ठल गायकवाड, विनायक गजभारे, सुखा सिंग टाक, सिद्धोधन कापसे आदी युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



























