सोलापूर : पोलिस दलात तब्बल ४० वर्षे विविध पदांवर कार्यरत राहून उल्लेखनीय सेवा बजावणारे व सामाजिक जाणीव जागवणारे दिवंगत निवृत्त पोलीस निरीक्षक केरू जाधव यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त ‘एक वही, एक पेन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार (दि. ४) रोजी सायंकाळी. ६ वा. न्यू बुधवार पेठ येथील समता परिवार बुद्ध विहार, समता चौक येथे पार पडणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन समता सैनिक दल, समता परिवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान कृती समिती, बी.आर. मॉर्निंग ग्रुप, रमाई महिला मॉर्निंग ग्रुप तसेच दिवंगत केरू जाधव साहेब मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्यांनी फुले किंवा हार न आणता ‘एक वही आणि एक पेन’ घेऊन यावे, असे आवाहन संयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे. दिवंगत केरू जाधव यांनी आपल्या सेवाकाळात आणि निवृत्तीनंतरही गोरगरीब, बहुजन, मागासवर्गीय व श्रमिक वर्गासाठी आयुष्य वाहिले, त्यांच्या कार्याला सलाम म्हणून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे.

















