सोलापूर – अज्ञात कारणावरून एका २८ वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरात छताच्या लोखंडी हुकाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जुळे सोलापुरातील रत्नमंजिरी नगरात आज सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
किरण कामण्णा हक्के (वय २८वर्ष , रा.रत्नमंजिरी नगर , जुळे सोलापूर) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे .मयत किरण याचे आई, वडील आणि भावाचे निधन झाल्यामुळे तो घरात एकटाच राहत होता. आज सोमवारी दुपारी जेवायला आला नाही म्हणून मामाने किरण यास फोन केला.फोन उचलत नसल्याचे पाहून ते घरी अडीच वाजेच्या सुमारासआले तेव्हा त्याचा मृतदेह घरातील छताच्या लोखंडी हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
दरम्यान विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एस बी फुलारी हे घटनास्थळी पोहोचून इतरांच्या मदतीने दरवाजा उचकटून किरण हक्के याचा मृतदेह बाहेर काढून येथील शासकीय रुग्णालयात सायंकाळी पाच वाजता दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .

















