मंद्रूप
जोडमोटे वस्ती, मंद्रूप येथे दरवर्षी उत्साहात साजरा होणाऱ्या “श्री भ्रमरांबिका” नवरात्र महोत्सवासाठी यंदाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. महोत्सवाच्या उत्सवाध्यक्षपदी शिवानंद बेलाटे यांची निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी गोटू शिंगडगाव व महेश लिंबितोटे यांची निवड करण्यात आली आहे. खजिनदारपदी रमेश जोडमोटे व बसप्पा जोडमोटे, तर सचिवपदी विनायक म्हेत्रे व विशाल नंदुरे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सहसचिवपदी प्रवीण ख्याडे व नवनीत जोडमोटे, कार्याध्यक्षपदी विशाल ख्याडे व निरंजन जोडमोटे यांची निवड झाली आहे. तसेच मिरवणूक प्रमुखपदी तुकाप्पा जोडमोटे, अनिल कडते व कुमार जोडमोटे, तर ज्योत यात्रा प्रमुखपदी गुरुनाथ जोडमोटे, मल्लिकार्जुन जोडमोटे व विशाल केवटे यांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवाच्या नियोजनासाठी निलेश जोडमोटे आणि संस्थापक अध्यक्ष शिवपुत्र जोडमोटे यांचे मार्गदर्शन असणार आहे.
Post Views: 14