टेंभुर्णी-अकलूज मार्गावरील अष्टविनायक एच.पी. पेट्रोल पंपासमोर २९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात वेणेगाव येथील महावीर मल्हारी माने (वय ५५) यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर माने हे एमएच ४५ एक्स २९५९ या स्प्लेंडर मोटारसायकलवरून वेणेगावहून शेवरे येथे जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या एमएच ४२ जे २८३१ क्रमांकाच्या मोटारसायकलची धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
याप्रकरणी धिरज महावीर माने यांच्या फिर्यादीवरून शिवरत्न सोपान भोसले (रा. माळेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ सरडे करीत आहेत. |
Post Views: 13