बार्शी – कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी ६२ अर्ज विक्री झाले असून एकाच व्यक्तीने दोन अर्ज दाखल केली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिस सय्यद यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी सर्वसाधारण सहकारी संस्था मतदारसंघातून सूर्यकांत शिवाजी गुंड व सुरेश उर्फ सूर्यकांत शिवाजी गुंड, रा. लाडोळे यांनी २ अर्ज भरले आहेत.
अर्ज भरतेवेळी त्यांच्याबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रणवीरभैय्या राऊत, अभिजीत कापसे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रणजीत गुंड, दिनकर गुंड, दत्तप्रसाद पाटील, वाणेवाडीचे चेअरमन रमेश यादव उपस्थित होते.
इतर कोणत्याही मतदारसंघातून आज पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. अर्ज भरण्याची शेवट तारीख ७ नोव्हेंबर २०२५ असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिस सय्यद यांनी दिली.


















