नांदेड / मुदखेड: लातूर येथे यलम मित्र परिवाराच्या वतीने यलम समाज स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलचे मुख्याध्यापक विजयकुमार बेंबडे यांना यलम समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोलकुमार पल्ले महाराज,माधवराव नारागुडे यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. विजयकुमार बेंबडे गेल्या २७ वर्षापासून शिक्षणाच्या क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र कार्य अत्यंत सेवाभावी वृत्तीने करीत आहेत. शिक्षण, पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मूलन, विवेकजागर, वाचनालय चळवळ इत्यादी क्षेत्रातही ते सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत आहेत.
आपल्या कार्यावरील निष्ठा, सेवाभाव,संघटन आणि समाजउत्थानाच्या विविध चळवळीत सक्रिय सहभाग बेंबडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक विशेष आहेत. या त्यांच्या यशाबद्दल डॉ.जगदीश कदम, डॉ. कमलाकर चव्हाण, प्रा. नारायण शिंदे,नारायणराव गैणवाड,श्रीनिवास मस्के, डॉ. जितेंद्र पुल्ले,सनदी लेखापाल मनोहर आयलाने, राजकुमार मोरे, नागनाथ आकनगिरे, लिंगराम हंडरगुळे,बलभिम मद्रे, प्रा जितेद्र पुल्ले, सरआमच्या संस्थेचे अध्यक्ष केशव कदम, गोंविंद कालानी, माधवराव पचलिंग आंबेगावकर यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


















