केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य करताना लातूरचे माजी महापौर यांनी युवा बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली असून सर्वसामान्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळालेला नाही अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. आज आपल्या देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. खर तर येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील हा अखेरचा अर्थसंकल्प आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना फार मोठ्या अपेक्षा होत्या. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही घोषणा करण्यात आल्या परंतु महसुली उत्पन्नाचा विचार करता त्या पूर्णत्वास येणार नाहीत असे चित्र दिसते. आपला देश हा कृषी प्रधान देश असताना शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच आली आहे. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या भेडसावत असताना तरुणांना रोजगार निर्मितीची कसलीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. विशेषतः सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित पेट्रोल डिझेल आणि गॅस दर यातून देखील दिलासा देण्यात आला नाही. जागतिक स्तरावर क्रूड ऑइलच्या किमती घटत असतानाही याचा लाभ नागरिकांना होत नाही.कृषी क्षेत्राला केवळ 1.25 टक्के तर आजच्या युगात सर्वात महत्त्वाचे असणारे संपर्क व माहिती प्रसारण क्षेत्रास केवळ 1.23 टक्के तरतूद करण्यात आली आहे जेणेकरून खासगी कंपन्यांना वाव मिळेल. शेजारील शत्रू देश आपले विस्तारवादी धोरण राबवित असताना संरक्षण क्षेत्रास केवळ 8 टक्के इतकीच तुटपुंजी तरतूद यात करण्यात आली आहे. एकूणच केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वर्तमान पत्राचे मथळे भरण्यासाठी मांडलेला हा अर्थसंकल्प युवा बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या पदरी निराशा देणारा आणि सर्वसामान्यांना कसलाही दिलासा न देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















