टेंभुर्णी – माढा मतदारसंघात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे (भाजप) कमळ चिन्ह असलेल्या सर्व जागांवर विजय मिळावा, यासाठी तरुणांनी निवडणुकीचे नेतृत्व हातात घ्यावे, असे आवाहन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह (भय्या) शिंदे यांनी केले.
शिराळ (ता. माढा) येथील ज्येष्ठ नेते अरुण काका लोकरे यांनी दोनशे कार्यकर्त्यांसह भव्य फोर व्हीलर रॅलीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी, शिराळ टें परिसरातील कार्यकर्त्यांनी मागील काळातील पक्षाच्या नेतृत्वाबाबत विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकीतही जास्तीत जास्त मतांसह भाजपचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला.
रणजीतसिंह शिंदे म्हणाले, “माझे मार्गदर्शक बबनदादा शिंदे निवडणुकीदरम्यान नसल्यामुळे तुम्हा सर्वांनी पक्षाचा पाया अधिक मजबूत करावा. विकासकामे मार्गी लावल्यानंतर उर्वरित कामांची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. कोणतीही गरज किंवा समस्या असो – तुमच्या सेवेची आम्ही सदैव तयारी ठेवू. भाजपच्या विश्वासावर पुढे चला.”
तालुकाध्यक्ष योगेश (बाबाराजे) बोबडे यांनी प्रवेशकर्त्यांचे भाजपा कुटुंबात स्वागत करत,”विधानसभा निवडणुकीप्रमाणेच कार्यकर्त्यांनी कसलाही भ्रम न ठेवता, बोल बुलयाच्या ताफ्यांना बळी न पडता भाजप पक्षाच्या उमेदवारांना घवघवीत मतांनी निवडून द्यावे,” असे यावेळी आव्हान केले
यावेळी जेष्ठ नेते अरुण काका लोकरे म्हणाले की काही उत्साही नेत्यांमध्ये चर्चा होती की, “नेते गेले, कार्यकर्ते राहिले या चर्चा फोल आहेत. आम्ही मोठ्या रॅलीद्वारे भय्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये एकत्र आलो, हे सर्वांना दाखवले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांना कुर्डू जिल्हा परिषद गटात व पंचायत गणात विजय मिळवून देण्यासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहू
या प्रवेश सोहळ्यात माजी कृषी सभापती संजय पाटील (भिमानगर), युवा नेते गोटू पाटील (अकोले खुर्द) चांदचे टकले चेअरमन, बाळासाहेब ढगे, तसेच समाधान यादव, महादेव लोकरे, प्रदीप लोकरे, राजेंद्र लोकरे, बंडू मुळे, अक्षय लोकरे, अमोल नवले, सुरेश तळेकर, शिवाजी सोलंकर, महादेव घाडगे, दीपक पाटील, आदी सहभागी झाले होते.
शिराळ व परिसरातून फोर व्हीलर रॅली काढून टेंभुर्णी शहरातून निमगाव टें पर्यंत रॅली आल्याने अनेक कार्यकर्त्यातून उत्साही वातावरणात झालेल्या या प्रवेशाने भाजपा शिंदे गटाची ताकद पुढील जिल्हा परिषद निवडणुकीची दिशा ठरणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
















