Saturday, April 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

निवडणुकी दरम्यान गुन्हेगारावर प्रशासनाची करडी नजर

तरुण भारतbyतरुण भारत
November 9, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली असल्याचे दिसून येत आहे.

पंढरपूर नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सचिन इथापे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये आदर्श आचारसंहिता व इतर निवडणुकीबाबीची माहिती दिली.


यावेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले, पंढरपूर शहरातील सर्व मतदान केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी मतदारांना सुविधा देण्यात येणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रावर करडी नजर ठेवण्यात येणार असून पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची नावे काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.एकंदरीत पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक शांततेत पार पडावी. यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे.

सीमा होळकर असणार निवडणूक निर्णय अधिकारी –
पंढरपूर नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सचिन इथापे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या सुधारित आदेशानुसार श्रीमती सीमा होळकर ( उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक सात ) या पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी काम पहाणार असल्याची माहिती येथील प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
——————–

आकडे बोलतात –
निवडणूकीसाठी शहर आणि उपनगरात मिळून ९७ मतदान केंद्रे. एकुण मतदार संख्या ९४ हजार ५५९ इतकी आहे. नऊ क्षेत्रीय अधिकारी तैनात त्यांच्यामार्फत देखरेख. ज्या ठिकाणी तीन पेक्षा जास्त मतदान केंद्रे असतील तिथे जास्तीचा पोलिसबंदोबस्त असणार. 
——————

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या मंडळींवर कडक कारवाई –
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकी  दरम्यान गुन्हेगारावर प्रशासनाकडून करडी नजर  ठेवली जाणार असून पोलिस प्रशासनाच्या मदतीने अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यां मंडळींवर हद्दपारी वैगरे प्रतिबंधात्मक कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे  येथील प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.
——————–

प्रांताधिकाऱ्यांच्या सुचना –
बेकायदेशीर होर्डिंग्ज, बँनर्स तातडीने काढून घ्यावेत अन्यथा मालमत्ता विद्रुपीकरण कायद्या अंतर्गत केली जाणार कारवाई.प्रिटींगप्रेस धारकांनी देखील घातलेले निर्बंध लक्षात घेऊन आणि सुचनांचे पालन करुन पोस्टर्स, बँनर्स छापुन द्यावेत. राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी अनामत रक्कम एक हजार तर सर्वसाधारण प्रवर्गांसाठी दोन हजार रुपये अनामत रक्कम असणार आहे. राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी जातपडताळणी प्रमाण सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत असणार आहे. प्रत्येक उमेदवाराने नामनिर्देशन पत्रामध्ये शपथपत्र सादर करावयाचे असून या मध्ये सर्व स्थावर, जंगम मालमत्ता तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील जर असेल तर तो बिनचुक कोणतीही माहिती राखून न ठेवता प्रसिध्द करावयाचा आहे.

Post Views: 40
Previous Post

भाजपच्या सर्व जागा जिंकण्यासाठी तरुणांनी निवडणूक हातात घ्यावी

Next Post

संध्याराणी बंडगरला दुहेरी मुकुट, वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धा 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संध्याराणी बंडगरला दुहेरी मुकुट, वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धा 

ताज्या बातम्या

‘तरुण भारत ‘च्या पुणे आवृत्तीचे लोकार्पण

April 18, 2026

अक्षय तृतीया संकल्पनातून आत्मसमृद्धीकडे नेणारा दानाचा दिव्य मार्ग – मुनिश्री

April 18, 2026

जुळे सोलापूर ब्रह्म बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने परशुराम पूजन आयोजन

April 18, 2026

हमीभावाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी ; सोयगाव

April 18, 2026

सीबीएसई बोर्ड परीक्षेमध्ये निरज पाटील प्रथम

April 18, 2026

सोलापूरच्या रणरागिणींची विजयी घोडदौड ; कोल्हापूर आणि पुण्यावर दिमाखदार विजय

April 18, 2026

कर्णधार संदेश गाडेचे शानदार शतक; श्रवण माळी ‘ मॅन ऑफ द मॅच ‘

April 18, 2026

दोन्ही आ. देशमुख करत आहेत करवाढीला विरोध

April 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0816855

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697