करमाळा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या करमाळा शहर अध्यक्षपदी जमीर सय्यद यांची जिल्हा अध्यक्ष वसंतराव देशमुख व कार्याध्यक्ष रवींद्र भाऊ पाटील यांनी निवड केली आहे.
करमाळा शहर अध्यक्षपदी निवडीचे पत्र माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे हस्ते सय्यद यांना देण्यात आले.
करमाळा शहरातील सर्व समाजातील नागरिकांसोबत सय्यद यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. करमाळा शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सतत आघाडीवर असतात. सर्व समाजात त्यांचा मित्र परिवार आहे. मुस्लिम समाजाचे अध्यक्ष म्हणून देखील ते चांगले काम करीत आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी करमाळा शहरामध्ये आघाडीवर राहून पक्षाचे काम केले होते.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची निवड जाहीर केली. सय्यद यांच्या निवडीमुळे करमाळा शहरातील सर्व समाज घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खा.धैर्यशील मोहिते-पाटील, आ.नारायण आबा पाटील, जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, तालुका अध्यक्ष अमरजीत साळुंके यांनी त्यांचे निवडीनंतर अभिनंदन केले.



















