सोलापूर- श्री शंभोमारुती चॅरिटेबल ट्रस्ट जुना विडी घरकुल येथे आमदार देवेंद्र कोठे व नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न झाले.
जुना विडी घरकुल येथे श्री शंभोमारुती चॅरिटेबलच्या वतीने आमदार देवेंद्र कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीराचे उदघाटन नगरसेवक सतीश सिरसुल्ला, नगरसेविका दीपिका यलदंडी, नगरसेविका उज्वला दासरी, विजय रामपुरे, अविनाश दासरी, वासू यलदंडी, सोलापूर महानगरपालिकेची शहर क्षयरोग अधिकारी प्रसाद कुमार, क्षयकिरण तज्ञ गुरुप्रसाद इनामदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका कोष्टी, दिपक स्वामी,डॉ . शितलकुमार चिलगुंडे, रुपेश कुमार, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सेक्रेटरी संतोष सोमा, राजू होशेट्टी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात रक्त तपासणी, मोफत गोळ्या औषधे, मोफत एक्स रे व इतर तज्ञ डॉक्टरांकडून २५० नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात आले व त्यांना औषध देण्यात आले. तसेच नॅचरल वेदना मुक्ती केंद्र डॉ. नंदकिशोर हबीब यांच्याकडून २३५ नागरिकांना बोन सेटिंग मोफत करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नगरसेवक सिध्देश्वर कमटम, विजय चिप्पा, प्रशांत पल्ली, हरिनिवास बिल्ला, साबीर कुर्ले, नेताजी मेरगू आदींनी भेट दिली. मान्यवरांचा सत्कार श्री शंभोमारुती चॅरिटेबल ट्रस्ट वतीने करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष नरेश कोलप्याक, गोविंद संकारम, रवि बुगडे, कृष्णा कोलप्याक, मधुकर बुगडे, अमर संगा, सागर गंजी, शुभम वईटला, सागर गंजी, राहुल नक्का, आकाश कोलप्याक, गोविंद बुगडे, ओंकार ब्राम्हणला आदीनी परिश्रम घेतले.
Post Views: 15