भोकर – भोकर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या भोसी ग्रामपंचायतचे उपसरपंच सुरेश रामजी पाटील व भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विलास दिंगाबर शिंदे पाटील यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
उपसरपंच सुरेश पाटील व विलास शिंदे पुर्वी काग्रेसचेच होते परंतू खा.अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर चव्हाण यांच्या सोबत गेले होते परंतु भाजपमध्ये एकाधिकारशाही धर्म आणि जातीचे राजकारण असल्यामुळे या पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय आपण घेतल्याचे पाटील, शिंदे यांनी सांगितले काँग्रेसपक्ष हा सर्व जातीधर्माला घेवून चालणारा पक्ष असल्याने आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे जाहीर करून भोकर काँग्रेस पक्ष कार्यालयात दि.६नोहेबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाचे भोकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील, पक्षनिरीक्षक अजिज भाई कुरेशी, शेख मुख्तार नांदेड शहर काँग्रेस अध्यक्ष यांनी पुष्पहार टाकून स्वागत केले आहे.
यावेळी श्याम पाटील लगळूदकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष तोसिफ इनामदार,धोंडबाजी भिसे,निळकंट वर्षेवार, बाबाखान, गोविंद देशमुख, आदिनाथ चिंताकुठे आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.



















