Tuesday, May 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘शिळ्या भाकरी’हा काव्यसंग्रह विद्रोहाची जाणीव करून देतो: प्रज्ञाधर ढवळे

तरुण भारतbyतरुण भारत
November 9, 2025
in marathwada
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कंधार / नांदेड – ‘शिळ्या भाकरी’ हा काव्यसंग्रह शिक्षणाचे महत्व सांगणारा आणि विद्रोहाची जाणीव करुन देणारा काव्यसंग्रह आहे. आधुनिक काळात हा काव्यसंग्रह सर्वसामान्य लोकांना प्रेरणा आणि उर्जा देईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक तथा समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले.


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम शाळा प्रवेश दिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी विद्यामंदिर, कंधार येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक देविदास वाघमारे यांच्या ‘शिळ्या भाकरी’ या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी, दि.७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११‌.३० वाजता सिध्दार्थनगर, कंधार येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख भाष्यकार म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे व कार्यक्रमाचे उद्‌घाटक ज्येष्ठ साहित्यिक तथा सेवानिवृत्त प्राचार्य माधव जाधव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी काॅलेजचे मराठी विभागाचे प्रमुख प्रो.डाॅ‌.दिलीप सावंत, ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, कवयित्री रुपाली वैद्य-वागरे, कवयित्री ज्योती परांजपे, प्रसिद्ध कवी प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड यांची उपस्थिती होती.


या कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त मुख्याध्यापक देविदास वाघमारे यांनी करुन ‘शिळ्या भाकरी’ काव्यसंग्रह लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘शिळ्या भाकरी’ या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन करण्यात आले.


‘शिळ्या भाकरी’ या काव्यसंग्रहावर भाष्य करताना प्रज्ञाधर ढवळे म्हणाले, देविदास वाघमारे यांचे गुराख्यापासून गुरुजी हे पहिले, तर शिळ्या भाकरी हे दुसरे साहित्य अपत्य आहे. शिळ्या भाकरी हा काव्यसंग्रह प्रचंड वेदना मांडणारा आणि काळजाला भिडणारा आहे. देविदास वाघमारेंनी परंपरेला छेद देऊन कवितांची उत्कृष्ट मांडणी केली आहे. यात प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या आणि परिवर्तन घडविणाऱ्या कवितांचा समावेश आहे. शिक्षण आणि विद्रोहाची जाणीव यांचा संबंध शिक्षण व्यक्तीला विचार करण्यास, प्रश्न विचारण्यास आणि अन्यायाविरुद्ध लढण्यास शिकवते. हे केवळ ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया नाही, तर आत्मसन्मान, हक्कांची जाणीव आणि निर्भयतेची भावना वाढवणारे एक शक्तिशाली साधन आहे. शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये चारित्र्यशक्ती आणि इतरांबद्दल सहानुभूती निर्माण होते, ज्यामुळे ती सामाजिक बदलासाठी लढण्यास प्रवृत्त होते, असेही ते म्हणाले.


या कवितासंग्रहाच्या प्रकाशनानंतर कविसंमेलन पार पडले. या कविसंमेलनाच्या अध्यक्षा कवियत्री प्रतिभा पांडे हे होत्या. यावेळी माधव जाधव, नागोराव डोंगरे, रुपाली वागरे-वैद्य, ज्योती परांजपे-करवंदे, प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड, डॉ.दिलीप सावंत, अनुरत्न वाघमारे, प्रज्ञाधर ढवळे, अलका मुगटकर, भाग्यश्री आसोरे, ज्योती लाभशेटवार, अंजली हिंगोले, नाना गायकवाड, देवीदास वाघमारे, रोहिणी कांबळे, प्रकाश ढवळे, भगवान अमलापूरे, वैजनाथ कांबळे, जीजाबाई गायकवाड, ॲड.प्रशांत कांबळे आदी कवींनी एकापेक्षा एक बहारदार कवितांचे सादरीकरण करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कवींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष रामराव पवार, कंधार तालुका अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड.उत्तम लुंगारे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष जितेंद्र ढवळे, अंकुर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप पांगरीकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रोहिदास वाघमारे, ग्रो अॅड् ग्लो पब्लिक स्कुलचे संचालक शंतनु कैलासे, रमाई गॅस सर्व्हिसचे मॅनेजर तुकाराम गायकवाड, औषध निर्माण अधिकारी दिलीप कांबळे, अॅड.जी.पी.गवाले, ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ कांबळे, प्रा.राजूरकर, दिपक कांबळे, अॅड.सिध्दार्थ वाघमारे, अॅड.तथागत वाघमारे आदींची उपस्थिती होती.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सी.डी.कांबळे यांनी केले. तर आभार सेवानिवृत्त मुख्याध्यापक देविदास वाघमारे यांनी मानले. जाणीव अस्मितेची साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्यतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

Post Views: 102
Previous Post

उपसरपंच सुरेश पाटील यांचा भाजपला रामराम

Next Post

नगरपरिषद निवडणुकीस काँग्रेस – शिवसेना सज्ज

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नगरपरिषद निवडणुकीस काँग्रेस - शिवसेना सज्ज

ताज्या बातम्या

पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धेचे’ विजेते

पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धेचे’ विजेते

May 18, 2026
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा; मुंबई, कोल्‍हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा; मुंबई, कोल्‍हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद

May 18, 2026

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कान्समध्ये मराठमोळा अंदाज #viral #maharashtranews

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; जिल्हा परिषदेत सीईओ कुशल जैन व उपाध्यक्ष पवार सायकलवरून कार्यालयात #solapurnews

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; मनपात महापौर, उपमहापौर ई- बाईकवर तर गटनेता नरेंद्र काळे आले सायकलवर #aajsolapur

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; जिल्हा परिषदेत सीईओ कुशल जैन व उपाध्यक्ष पवार सायकलवरून कार्यालयात #solapurnews

May 18, 2026

सोलापूरचे महेंद्र गायकवाड देशाचे ३९ वे हिंदकेसरी #viral #solapurnews

May 18, 2026

पैसे लुटून चोरट्यानी दहिटणे गावच्या शेतात टाकले एटीएम मशीन #marathinews #solapurnews

May 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0870538

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697